भारतातील बॅँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून पळालेल्या मद्यसम्राट विजय मल्याकडून वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे. मल्याची मद्यकंपनी असलेल्या युनायटेड ब्रेवरेजचे तब्बल ५६०० कोटी रुपयांचे शेअर्स सक्तवसुली संचालनालयाने वसुली अधिकाऱ्याकडे सोपविले आहेत. या अधिकाऱ्याच्या डीमॅट अकाऊंटमध्ये हे शेअर ठेवण्यात आले आहे.Vijay Mallya’s shares worth Rs 5,600 crore were handed over by the ED to the recovery officer
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतातील बॅँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून पळालेल्या मद्यसम्राट विजय मल्याकडून वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे. मल्याची मद्यकंपनी असलेल्या युनायटेड ब्रेवरेजचे तब्बल ५६०० कोटी रुपयांचे शेअर्स सक्तवसुली संचालनालयाने वसुली अधिकाऱ्याकडे सोपविले आहेत. या अधिकाऱ्याच्या डीमॅट अकाऊंटमध्ये हे शेअर ठेवण्यात आले आहे.
विजय मल्याचे सुमारे ५६०० कोटी रुपयांचे ४.१३ कोटी शेअर्स आहेत. डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनलच्या वसुली अधिकाऱ्याकडे ते सोपविण्यात आले आहे. सक्तवसुली संचालनालयाने ही कारवाई केली आहे. युनायटेड ब्रेवरेज कंपनीचा हा १५.६३ टक्के हिस्सा आहे. युनायटेड बेवरेज कंपनीने हे शेअर्स ट्रान्सफर केले आहेत.
मार्च २०१९ मध्ये युनायटेड ब्रेवरेज कंपनीने स्टॉक एक्सेंजला माहिती देऊन सांगितले होते की डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनलने कंपनीतील २.८० टक्के हिस्सा असलेले १०२५ कोटी रुपयांचे शेअर्स स्वत:च्या नावाने नोंदणी केली आहेत.
डच बिअ्रर कंपनी असलेल्या हेनकेनचे युनायटेड ब्रेवरेजमध्ये ४६.६९ टक्के हिस्सेदारी आहे. सध्या युनायटेड ब्रेवरेज कंपनीच्या शेअरची किंमत १३५९ रुपये आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत विजय मल्याकडे युनायटेड ब्रेवरेज कंपनीची ८.०८ टक्के हिस्सेदारी होती.
विजय मल्या यांने बँकांकडून घेतलेल्या कजार्पैकी ३७०० कोटी रुपये फॉम्युर्ला-१ कार रेसिंग कंपनी, टी-२० आयपीएल संघ आणि खासगी विमानातून चैनीसाठी प्रवास अशा बाबींवर उधळले असल्याचा उल्लेख सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्रात केला होता.
ईडीने मल्या आणि त्याच्या किंगफिशर एअरलाइन्स लि. आणि युनायटेड ब्रेवरीज (यूबी होल्डिंग्ज लि.) या कंपन्यांविरुद्ध मुंबईतील विशेष न्यायालयात प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्टअंतर्गत आरोपपत्र दाखल केले. स्टेट बँक ऑफ इडियाने भारतीय बँकांच्या वतीने मल्याच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
मल्याने २००५ ते २०१० या काळात कजार्चे हप्ते चुकवून बँकांचे ६.०२७ कोटी रुपयांचे नुकसान केले, असे स्टेट बँकेने तक्रारीत म्हटले होते. तसेच १५ मे २०१८ अखेर मल्याने चुकवलेल्या कजार्ची आणि व्याजाची रक्कम ९,९९०.०७ कोटी रुपयेइतकी भरते असेही म्हटले आहे. सीबीआयने दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालावरून ईडीने ऑगस्ट २०१६ मध्ये मल्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App