कोरोना लसीकरणाबाबत लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारने रणनीती तयार केली आहे. ही रणनीती अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना अद्याप कोरोना लसीचा एकही डोस मिळालेला नाही. सरकारने आपल्या रणनीतीमध्ये अशा लोकांनादेखील समाविष्ट केले आहे, ज्यांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, परंतु दुसरा डोस देणे बाकी आहे. Vaccinated People will get reward, government likely to made lucky draw strategy to promote corona vaccination
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाबाबत लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारने रणनीती तयार केली आहे. ही रणनीती अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना अद्याप कोरोना लसीचा एकही डोस मिळालेला नाही. सरकारने आपल्या रणनीतीमध्ये अशा लोकांनादेखील समाविष्ट केले आहे, ज्यांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, परंतु दुसरा डोस देणे बाकी आहे.
याशिवाय, सरकारने पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांसाठी साप्ताहिक किंवा मासिक लकी ड्रॉ कार्यक्रम सुरू केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी लसीकरण करणे आणि पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांना बॅज प्रदान करणे यासारख्या इतर उपक्रमांचीही योजना आखली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हे उपक्रम लवकरच सुरू करण्याची सूचना केली जाऊ शकते.
सरकार पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांची नियुक्ती करून ‘हर घर दस्तक’ उपक्रमाला चालना देऊ शकते, कारण सरकारचा असा विश्वास आहे की पूर्ण लसीकरण झालेले लोक हे लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आणि लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्याच्या महत्त्वाबद्दल चांगला सल्ला देऊ शकतात. एका सूत्राने सांगितले की, “ज्यांनी अद्याप लसीचा एक डोस घेतला नाही अशा लोकांना लक्षात घेऊन कामाच्या ठिकाणी लसीकरण आयोजित केले जाऊ शकते.” खासगी आणि सरकारी कार्यालये आणि इतर कामाच्या ठिकाणी कर्मचार्यांना लसीकरण संदेशांसह बॅजदेखील दिले जाऊ शकतात. यामध्ये ‘मी लसीकरण पूर्ण केले आहे’, ‘तुम्हीही पूर्णपणे लसीकरण केले आहे का?’ अशा बॅजचा समावेश आहे.
“तसेच, पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांसाठी साप्ताहिक किंवा मासिक लकी ड्रॉ कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात,” सूत्राने सांगितले. लकी ड्रॉच्या विजेत्यांना स्वयंपाकघरातील वस्तू, रेशनचे साहित्य, प्रवासाचे पास, इतरांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी रोख बक्षीस यासारख्या गोष्टी दिल्या जाऊ शकतात. पहिला डोस प्राप्त झाला आहे, तर सुमारे 43 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. त्याच वेळी 12 कोटींहून अधिक लोकांना दुसरा डोस देणे बाकी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App