ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं वयाच्या ५८ व्या वर्षी निधन ; मुंबईच्या सेव्हन हिल रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

१९८७ मध्ये ‘सूत्रधार’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. माधवी गोगटे यांनी मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्यांच्या काही भूमिका चांगल्याच गाजल्या.Veteran actress Madhavi Gogte dies at 58; He breathed his last at Mumbai’s Seven Hill Hospital


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं वयाच्या 58 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना कोरोनाचं निदान झालं होतं.मुंबईच्या सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून माधवी गोगटे रसिकांच्या मनावर राज्य करत होत्या.

माधवी गोगटे यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६४ रोजी झाला. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. १९८७ मध्ये ‘सूत्रधार’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. माधवी गोगटे यांनी मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्यांच्या काही भूमिका चांगल्याच गाजल्या.

माधवी गोगटे यांची ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही नाटकं तुफान गाजली होती. या नाटकांप्रमाणेच ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष लोकप्रिय ठरली होती. तसेच माधवी यांनी ‘तुझं माझं जमतंय’ या मराठी मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

विशेष म्हणजे त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं होतं.
मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत.

Veteran actress Madhavi Gogte dies at 58; He breathed his last at Mumbai’s Seven Hill Hospital

महत्त्वाच्या बातम्या