Kangana Controversy : कंगना रनौतवर कठोर कारवाई हवी मनजिंदर सिंग सिरसा, मुंबईतील खार पोलीस ठाण्यात तक्रार करणार

कंगना रनौत आणि वाद हे नित्याचेच झाले आहे. तिच्या वक्तव्यांमुळे ती चर्चेत असते तर कधी त्या वक्तव्यांमुळे ती अडचणीतही येते. आता नुकतेच कंगनाच्या एका वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. कंगनाचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांना कंगनावर कठोर कारवाई करण्याची इच्छा आहे. Manjinder singh sirsa says our delegation will reach khar police station mumbai to file complaint against kangana ranaut


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कंगना रनौत आणि वाद हे नित्याचेच झाले आहे. तिच्या वक्तव्यांमुळे ती चर्चेत असते तर कधी त्या वक्तव्यांमुळे ती अडचणीतही येते. आता नुकतेच कंगनाच्या एका वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. कंगनाचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांना कंगनावर कठोर कारवाई करण्याची इच्छा आहे.

मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, आता कंगनाच्या विरोधात मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली जाईल आणि त्याचवेळी याप्रकरणी महाराष्ट्र सचिवालयात गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे.

त्यांनी ट्विट केले की, ‘आमचे शिष्टमंडळ आज सकाळी ११ वाजता मुंबई, खार पोलीस ठाण्यात अभिनेत्री कंगना रनौतच्या चुकीच्या जातीय टिप्पणीबद्दल तक्रार दाखल करणार आहे. त्यानंतर दुपारी 1.00 वाजता हे शिष्टमंडळ महाराष्ट्र सचिवालयात जाऊन माननीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे.

कंगना रनौतचे भारताच्या स्वातंत्र्यावर वादग्रस्त विधान

बॉलीवूड क्वीन कंगना रनौत सध्या महात्मा गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिच्यावर अनेक कॉमेंट्स केल्या जात आहेत. कंगनाने मंगळवारी (१६ नोव्हेंबर) तिच्या वक्तव्यात म्हटले की, महात्मा गांधींनी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना मदत केली नाही. याशिवाय कंगना म्हणाली की, जर कोणी एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य मिळत नाही. 1947 मध्ये भीक मागण्यात स्वातंत्र्य मिळाले. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये (मोदी सरकार आल्यानंतर) मिळाले. कंगनाच्या इंस्टाग्रामवर केलेल्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.कंगना रनौतने स्पष्टीकरणात काय म्हटले?

कंगनाच्या या मतांवर जेव्हा अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि तिला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले तेव्हा ती म्हणाली, ‘मी स्पष्टपणे सांगितले आहे की 1857 ची क्रांती ही पहिली स्वातंत्र्य लढा होती, जी दडपण्यात आली होती. यानंतर ब्रिटीशांचे अत्याचार आणि त्यांचे क्रौर्य वाढले. यानंतर सुमारे शंभर वर्षांनंतर आपल्याला भिकेच्या रूपाने स्वातंत्र्य मिळाले. एका न्यूजपेपर आर्टिकलचे जुने कटिंग शेअर करत कंगना रनौतने लिहिले की, ‘1947 मध्ये काय घडले हे कोणी मला सांगितले तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करीन. 1857 मध्ये कोणती लढाई लढली गेली हे आपल्याला माहिती आहे. पण 1947 मध्ये कोणती लढाई लढली होती हे माहीत नाही.”

Manjinder singh sirsa says our delegation will reach khar police station mumbai to file complaint against kangana ranaut

महत्त्वाच्या बातम्या