वृत्तसंस्था
डेहराडून : चारधाम यात्रेवर कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर लादलेली बंदी उत्तराखंड हायकोर्टाने आज उठवली आहे. मात्र त्याच वेळी भाविकांच्या दैनंदिन संख्येवर मर्यादा घातली आहे.केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि जम्नोत्री अशी चारधाम यात्रा उत्तराखंडात होते.Uttarakhand HC lifts stay on Char Dham yatra; caps number of daily pilgrims
या चारही तीर्थ स्थानांवर सहाशे ते हजार एवढ्याच यात्रेकरूंना दैनंदिन उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य प्रशासनाने या संख्या मर्यादेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश यात्रेवरील बंदी उठवताना हायकोर्टाने दिले आहेत.
उत्तराखंडातील पर्यटन व्यवसाय संपूर्ण धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने दिलेला निर्णय महत्त्वाचा आहे. यात्रा सुरू झाल्यावर पर्यटन व्यवसायाला ऊर्जितावस्था येईल अशी अपेक्षा आहे हे हाय कोर्टाने देखील आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे.
त्याचबरोबर कोरोनाची लाट संपूर्णपणे ओसरलेली नाही. अजूनही लसीकरण देशभर सुरू आहे याची दखल घेऊन यात्रेकरूंच्या संख्येवर मर्यादा घातली आहे. ही मर्यादा यात्रेकरूंनी पाळायची आहे. राज्य सरकारने त्याची काटेकोर अंमलबजावणी करायची आहे, असेही हायकोर्टाने निकालपत्रात स्पष्टपणे बजावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App