माजी मंत्री कशाला म्हणता? दोन-तीन दिवसांत कळेलच… चंद्रकांतदादांच्या अवचित टिप्पणीने उंचावल्या भुवया


विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्यात सरकार स्थापनेच्या पडद्याआड हालचाली चालूच असल्याच्या चर्चेची पुन्हा कंडी पिकविणारे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. संत तुकारामांच्या पावन नगरी देहूमध्ये जाहीर कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले, की सारखे सारखे माजी मंत्री कशाला म्हणता… तुम्हाला दोन तीन दिवसांत काय ते कळेलच  Why saying former minister? Wait for two-three days… Chandrakant patil hints

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. देहूतील एका कार्यक्रमात मंचावरील व्यक्ती वारंवार माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख करत होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हे सूचक विधान केले.

शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारबद्दल सातत्याने उलटसुलट चर्चा होत असतात. १०५ आमदार असलेल्या भाजपला अनपेक्षित राजकीय घडामोडीनंतर विरोधी बाकांवर बसावे लागलेले आहे. दुसरीकडे सातत्याने भाजप व शिवसेना यांच्यात पुन्हा दिलजमाई होऊ शकते, शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप आता तयार झाला आहे, कदाचित काँग्रेसच या सरकारचा पाठिंबा काढून घेईल, अशा स्वरूपाच्या चर्चा सतत झडत असतात. यापूर्वीही चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवर यांनी करेक्ट कार्यक्रम लवकरच होईल, असे अनेकवेळा सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या विधानाने भुवया उंचावल्या आहेत.

Why saying former minister? Wait for two-three days… Chandrakant patil hints

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण