झारखंडला जाऊन उर्मिला मतोंडकरने केले कोरोना नियमांचे उल्लंघन


विशेष प्रतिनिधी

रांची : बॉलीवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर उपस्थित असलेल्या कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधक निबंर्धांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते झारखंडमधील पलामू जिल्ह्यात एका हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.Urmila Matondkar went to Jharkhand and violated Corona rules

मेदिनीनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात कोरोनासंबंधी निबंर्धांचे उल्लंघन झाल्याची तक्रार स्थानिकांनी प्रशासनाकडे केली, अशी माहिती उपायुक्त शशी रंजन यांनी दिली. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे हॉटेल प्रशासनाने मात्र आरोप फेटाळून लावले असून नियमांचे पालन झाल्याचा दावा केला आहे.



उर्मिला मातोंडकर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, अशी माहिती हॉटेल प्रशासनाने दिली आहे. कोरोनामुळे आपण या कार्यक्रमासाठी दोन तासांऐवजी एक तासच उपस्थित राहू, असे उर्मिला यांनी कळवले होते, असेही त्यांनी सांगितले आहे. उर्मिला यांनी बंद खोलीतून उपस्थितांशी संवाद साधला. यानंतर त्या रांचीसाठी रवाना झाल्या आणि तेथून विमानाने मुंबईला परतल्या.

Urmila Matondkar went to Jharkhand and violated Corona rules

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात