UP Assembly Election : स्टार प्रचारकाकडूनच काँग्रेसला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांचा पक्षाचा राजीनामा; भाजपमध्ये करणार प्रवेश

UP Assembly Election Big blow to Congress, resignation of former Union Minister RPN Singh; Will join BJP

UP Assembly Election : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आरपीएन सिंह यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. आरपीएन सिंह हे झारखंड काँग्रेसचे प्रभारी होते. त्यांनी मंगळवारी आपला राजीनामा सोनिया गांधींना पाठवला आहे. ते आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. UP Assembly Election Big blow to Congress, resignation of former Union Minister RPN Singh; Will join BJP


प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आरपीएन सिंह यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. आरपीएन सिंह हे झारखंड काँग्रेसचे प्रभारी होते. त्यांनी मंगळवारी आपला राजीनामा सोनिया गांधींना पाठवला आहे. ते आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ते आज दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच याबाबतची चर्चा होती. काँग्रेसने आरपीएन सिंग यांना यूपीमध्ये स्टार प्रचारक बनवले आहे. आरपीएन सिंग हे यूपीए सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. ते यूपीच्या पूर्वांचलमधील पडरौनाचा रहिवासी आहेत.

आरपीएन सिंह हे 1996, 2002 आणि 2007 मध्ये पडरौना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदारही राहिले आहेत. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत आरपीएन सिंह तिसऱ्या क्रमांकावर होते. 2004 मध्ये त्यांनी दुसरे स्थान पटकावले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत, रतनजीत प्रताप नारायण सिंह (RPN सिंह) यांनी निवडणुकीत विजय मिळवला आणि UPA-II सरकारमध्ये भूपृष्ठ वाहतूक आणि रस्ते राज्यमंत्री, पेट्रोलियम राज्यमंत्री आणि गृह राज्यमंत्री पद भूषवले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आरपीएन सिंह यांचा भाजप उमेदवार राजेश पांडे यांनी 85540 हजार मतांनी पराभव केला होता.

आरपीएन सिंह यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘आज जेव्हा संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे, तेव्हा मी माझ्या राजकीय जीवनात एक नवीन अध्याय सुरू करत आहे. जय हिंद!’

कोण आहेत आरपीएन सिंह?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरपीएन सिंह हे भाजपच्या तिकीटावर पडरौना मतदारसंघातून स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात. आरपीएन सिंह हे 1996 ते 2009 या काळात उत्तर प्रदेशातील पडरौना मतदारसंघातून आमदारही राहिले आहेत. कुंवर रतनजीत नारायण सिंग किंवा आरपीएन सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रातील मंत्री, पडरौना या संस्थानातील आहेत. त्यांना त्या ठिकाणचे राजेसाहेब म्हणतात. त्यांचा जन्म 25 एप्रिल 1964 रोजी दिल्लीत झाला. ते कुशीनगर येथील क्षत्रिय कुटुंबातील आहेत. पडरौनाजवळील कुशीनगर लोकसभा मतदारसंघातून जिंकून ते संसदेत पोहोचले. आरपीएन सिंह जवळपास 4 दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत आणि 3 वेळा आमदार आणि 1 वेळा खासदार राहिले आहेत.

UP Assembly Election Big blow to Congress, resignation of former Union Minister RPN Singh; Will join BJP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात