कृषी कायद्यांच्या विरोधात एक वर्षाहून अधिक काळापासून आंदोलन करत असलेले शेतकरी कृषी कायदे नरेंद्र मोदी यांनी मागे घेतले आहेत.’Unless the crime is stopped, he will not return home’; Warning of United Farmers Front
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरपासून ‘संयुक्त किसान मोर्चा’तील शेतकरी संघटना प्रामुख्याने सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत.
या आंदोलनावेळी शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.कृषी कायद्यांच्या विरोधात एक वर्षाहून अधिक काळापासून आंदोलन करत असलेले शेतकरी कृषी कायदे नरेंद्र मोदी यांनी मागे घेतले आहेत.
दरम्यान सरकारने कृषी कायदे मागे घेतले असेल तरी शेतकऱ्यांविरोधात दाखल गुन्हे मागे घेईपर्यंत घरी परतणार नाहीत.संयुक्त किसान मोर्चाची शनिवारी सिंघू सीमेवर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.यावेळी शेतकरी नेते दर्शनपाल सिंग म्हणाले की, आम्ही सरकारला स्पष्ट संकेत दिले की, जोपर्यंत शेतकऱ्यांविरुद्ध दाखल सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत ताेपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही.
आंदोलनासंबंधी पुढील बैठक ७ डिसेंबरला होणार आहे.सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात गठित समितीसाठी पाच शेतकरी प्रतिनिधींची नावे मागवली होती. त्यात बलबीरसिंग रजेवाल, शिवकुमार कक्का, गुरनामसिंग चढुनी, युद्धवीरसिंग व अशोक ढवळे यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App