कोलकाता विमानतळावर अज्ञात कॉलद्वारे विमान अपहरणाची  धमकी


एअर इंडिया ऑफिस मध्ये हा फोन बुधवारी सायंकाळी 7 ते 7.10 च्या दरम्यान आला होता.  फोन करणाऱ्याने त्याचे नाव प्रशांत बिस्वास असे सांगितले.  हा कॉल बंगाली भाषेत करण्यात आला होता. Unknown call arrived at Kolkata airport, threatened to hijack the plane


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंडियाच्या कार्यालयामध्ये धमकीचा फोन आल्याने एकच गोंधळ उडाला होता. एका व्यक्तीने दावा केला होता की, तो विमानाचे अपहरण करणार आहे. एअर इंडिया ऑफिसमध्ये हा फोन बुधवारी सायंकाळी 7 ते 7.10च्या दरम्यान आला होता.  फोन करणाऱ्याने त्याचे नाव प्रशांत बिस्वास असे सांगितले. हा कॉल बंगाली भाषेत करण्यात आला होता.

कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावर धमकीचा फोन आल्यानंतर विमानतळ प्रशासनाने तत्काळ कारवाई केली आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे बिधाननगर पोलिसांना कळवले. त्यांनी लगेच तपास सुरू केला. नंबर ट्रेस करण्यात आला आहे.  हा नंबर उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बोंगाच्या कुंडीपूर भागातील आहे.



नंबर ट्रेस होताच पोलिसांनी आरोपीच्या घरी धडक मारली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी आहे.  सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (आयजीआय विमानतळ) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. दिल्ली पोलिसांना अल-कायदाने ई-मेलद्वारे धमकी दिली होती.  ई-मेलमध्ये एका जोडप्याच्या नावाने धमक्या देण्यात आल्या होत्या, ज्यात पुढील काही दिवसात विमानतळावर बॉम्ब टाकण्यात येईल असे सांगण्यात आले होते.  मात्र, यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि विमानतळावरही सुरक्षा वाढवण्यात आली.

Unknown call arrived at Kolkata airport, threatened to hijack the plane

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात