शिवसेना आमदार यामिनी जाधव यांना अपात्र ठरविण्याची आयकर विभागाची शिफारस, निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली खोटी माहिती


विशेष प्रतिनिधी

मुंबई : निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याने शिवसेनेच्या भायखळा येथील आमदार यामिनी यशवंत जाधव यांना अपात्र ठरविण्याची शिफारस आयकर विभागाने केली आहे. यामिनी जाधव यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तिने दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात विसंगती आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.Income tax department’s recommendation to disqualify Shiv Sena MLA Yamini Jadhav, false information given in election affidavit

आयकर विभागाला त्याच्या तपासात कोलकातास्थित शेल कंपनीसोबत यामिनी जाधव यांचे संबंध आढलले आहेत. यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहे. जाधव कुटूंबियांनी १५ कोटीरुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आढळून आले आहे.



निवडणूक आयोगाने या प्रतिज्ञापत्राची पडताळणी करण्याचे आदेश आयकर विभागाला दिले होते. त्यानंतर आयकर विभागाने हे निष्कर्ष काढले आहेत.आयटी विभागाने म्हटले आहे की, यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड कडून एक कोटी रुपयांच्या कजार्चा लाभ घेतला.

प्रधान डीलर्स कोलकाता येथून एंट्री ऑपरेटरद्वारे चालवलेली आणि नियंत्रित केलेली शेल कंपनी असल्याचे आढळले. प्रधान डीलर्सच्या स्कायलिंक कमर्शियल लिमिटेड आणि सुपरसॉफ्ट सप्लायर्स लिमिटेड या कोलकत्तास्थित दोन शेअरहोल्डिंग कंपन्या आहेत

Income tax department’s recommendation to disqualify Shiv Sena MLA Yamini Jadhav, false information given in election affidavit

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात