केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. विमानप्रवासात त्यांनी आपल्या डॉक्टरी कर्तव्य पार पाडत एका गंभीर गरजू प्रवाशावर तातडीने उपचार केले. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. Union ministers’ diligence Dr Bhagwat Karad cares for critically ill patients during flight, showers of appreciation from public
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. विमानप्रवासात त्यांनी आपल्या डॉक्टरी कर्तव्य पार पाडत एका गंभीर गरजू प्रवाशावर तातडीने उपचार केले. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
सोमवारी इंडिगो फ्लाइटमधून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड प्रवास करत होते. यावेळी १२ ए सीटवरील एका सहप्रवाशाला गंभीर आरोग्य समस्या उद्भवली आणि तो प्रवासी कोसळला. योगायोगाने समोरच्याच सीटवर भागवत कराड बसलेले होते. प्रवासी कोसळल्याचे लक्षात येताच कुजबुज सुरू झाली. ती ऐकताच क्षणाचाही विलंब न करता, कोणताही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता कराडांनी एक डॉक्टर म्हणून ताबडतोब शुश्रूषा केली. कायम गहन, गंभीर बैठकांमध्ये व्यग्र असणाऱ्या डॉक्टर कराडांचे हे रूप पाहून त्यांच्यावर आता जनसामान्यांतून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
This is excellent! 👏🏼👏🏼 MoS Finance @DrBhagwatKarad, a doctor by profession, helping out a fellow passenger who felt unwell on a flight! https://t.co/x9P6FI6xxJ — Poulomi Saha (@PoulomiMSaha) November 16, 2021
This is excellent! 👏🏼👏🏼
MoS Finance @DrBhagwatKarad, a doctor by profession, helping out a fellow passenger who felt unwell on a flight! https://t.co/x9P6FI6xxJ
— Poulomi Saha (@PoulomiMSaha) November 16, 2021
यावर डॉ. भागवत कराडांनी प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते, तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली. आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. “एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ” संतांची हि शिकवण कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या!” केंद्रीय मंत्र्यांची ही कर्तव्यदक्षता अनुकरणीय आणि प्रशंसनीय असल्याचीच प्रतिक्रिया आता व्यक्त होऊ लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App