विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली:आज अर्थसंकल्प यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतरामन आपल्या संपूर्ण टिमसह संसद भावनात दाखल झाल्या आहेत .मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प असून केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांचा अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प असणार आहे. सकाळी 8.15 मिनिटांनी निर्मला सीतारमन आपल्या निवासस्थानाहून रवाना झाल्या. त्यानंतर 9 वाजता त्या बजेट ब्रीफ केससह राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाल्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाला अर्थसंकल्पाची थोडक्यात माहिती देतील आणि त्यानंतर संसदेकडे रवाना होतील. Union Budget 2022-23: For the fourth time in a row, budget with tabs, Nirmala Sitharaman, Bhagwat Karad and team will present ‘Budget 2022-23’ in Parliament at 11 am.
#WATCH | Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman arrives at the Parliament. She will present the #UnionBudget2022 today. pic.twitter.com/MQoxC388TZ — ANI (@ANI) February 1, 2022
#WATCH | Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman arrives at the Parliament. She will present the #UnionBudget2022 today. pic.twitter.com/MQoxC388TZ
— ANI (@ANI) February 1, 2022
प्रस्थापित परंपरेनुसार, भारताच्या राष्ट्रपतींना सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती दिली जाते. केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रपती कोणतेही बदल सुचवत नसल्यामुळे ही बैठक नेहमीचीच असते. परंतु संसदेत अधिकृतपणे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते.
आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील आणि त्यात नोकरदार आणि सर्वसामान्यांना काय मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यंदाचाही अर्थसंकल्प कागदविहीन म्हणजे डिजिटल असणार आहे. कोरोना महामारीमुळं आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशातील कर प्रस्ताव आणि प्रस्तुती तसेच वित्तीय विवरण अशा सर्व प्रकारच्या कागदपत्रांची छपाई होणार नाही.
त्यानंतर संसद भवनात केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक पार पडेल, ज्यामध्ये अर्थसंकल्पाला औपचारिकरित्या मंजुरी देण्यात येईल. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर होईल आणि अर्थमंत्री भाषण करतील बजेट स्पीचनंतर पंतप्रधान मोदी अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर वक्तव्य देतील…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App