पाकिस्तानी मौलवीच्या विखारी व्हिडीओमुळेच मुस्लिम मारेकऱ्यांकडून हिंदू तरुणाची हत्या


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानचा रहिवासी असणारा मौलाना खादिम रिझवी उर्फ साद रिझवी याचे द्वेषपूर्ण व्हिडिओ पाहून भारावलेल्या मारेकऱ्यांनीच गुजरातमध्ये हिंदू युवकाची हत्या केल्याचे पोलीसांच्या तपासात पुढे आले आहे. विशेष म्हणजे या मौलवीचा मृत्यू झाला असूनही त्याची विखारी भाषणे अद्यापही पाहिली जातात.Murder of Hindu youth by Muslim killers due to vicious video of Pakistani Maulana

गुजरातच्या धंधुका शहरात ‘आक्षेपार्ह’ फेसबुक पोस्टवरून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. या हत्याकांडाचा तपास करणाºया गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकानं तीन आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर या हत्याकांडामागे पाकिस्तानच्या एका मौलवीचा संबंध असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पाकिस्तानचा रहिवासी असणारा मौलाना खादिम रिझवी उर्फ साद रिझवी याचे द्वेषपूर्ण व्हिडिओ पाहून भारावलेल्या मारेकºयांनी गुजरातमध्ये ही हत्या घडवून आणली, असा खुलासा तपास अधिकाºयांनी केलाय.



दिवंगत मौलाना खादिम रिझवी हा पाकिस्तानातील मुस्लीम कट्टरतावादी गट ‘तहरिक-ए-लब्बैक पाकिस्तान’चा प्रमुख होता. नोव्हेंबर २०२० मध्ये साद रिझवीची हत्या ‘आयएसआय’च्या इशाऱ्यावरून करण्यात आली होती. पाकिस्तानी मौलाना मौलाना खादिम रिझवी याच्या विखारी भाषणांच्या व्हिडिओंमुळे आपल्यावर ताबा मिळवल्याचं गुजरातमधील धंधुका हत्याकांडातील आरोपींनी मान्य केले आहे . पाकिस्तानी मौलानाचे व्हिडीओ पाहण्यासाठी दिल्लीतील दोन मौलाना आरोपींना प्रोत्साहित करत होते.

यापैंकी एका मौलानाला गुजरात एटीएसनं दिल्लीतून अटक केलीय.या तरुणांच्या जाणून-बुजून धर्मांध कल्पनांनी भावना भडकावत त्यांना हल्ला करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले होते. यासाठी त्यांच्यावर पाकिस्तानी मौलाना साद रिझवी याच्या व्हिडिओंचा भडिमार करण्यात आला होता.

मौलाना साद रिझवी याचा नोव्हेंबर २०२० संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठीही रिझवी डोकेदुखीत बनला होता. रिझवीनं स्थापित केलेल्या तहरिक ए लब्बैक पाकिस्ताननं रावळपिंडी आणि इस्लामाबादला घेरलं होतं. त्यामुळे हजारो नागरिक या दोन शहरांमध्ये अडकून पडले होते. तसंच पाकिस्तानी लष्कर आणि पंतप्रधान इम्रान खान हेदेखील दबावाखाली आले होते.

ईशनिंदा कायद्याच्या नावावर पाकिस्तानी समाजात विष पेरणाऱ्या रिझवीच्या संशयास्पद मृत्यूनंतर आयएसायकडून त्याची हत्या घडवून आणण्यात आली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. इम्रान खान सरकारकडून मौलाना रिझवी याचा मृत्यू करोना विषाणू संक्रमणामुळे झाल्याचा दावा करण्यात आला होता. रिझवी बरेलवी समुदायाशी संबंधित होता.

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्लामसंबंधी केलेल्या एका वक्तव्यावर आक्षेप घेत मौलानानं फ्रान्स उत्पादनांविरोधात जोरदार विरोध प्रदर्शन केलं होतं. पाकिस्तानातील सर्वाधिक प्रभावी अशा पंजाब प्रांतावर रिझवीची मोठी पकड होती. २०११ मध्ये पंजाबच्या राज्यपालांची हत्या करणाºया मुमताज कादरी याच्या फाशीच्या शिक्षेला मौलाना रिझवीकडून विरोध करण्यात आला होता. पंजाबचे राज्यपाल सलमान तासीर यांनी ईशनिंदा कायदा सौम्य करण्याची मागणी केल्यानंतर मुमताज कादरी यानं त्यांची हत्या केली होती.

पाकिस्तानात ईशनिंदा कायद्याच्या नावावर अल्पसंख्यांक आणि अहमदिया समाजासोबत अनेक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. पाकिस्तानात इस्लामवर टीका केल्याबद्दल ईशनिंदा कायद्यात दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला फाशीची शिक्षाही सुनावली जाऊ शकते.

Murder of Hindu youth by Muslim killers due to vicious video of Pakistani Maulana

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात