जम्मू-काश्मीरमध्ये पाच पाकिस्तानी दहशतवादी ठार दोन ठिकाणी लष्कराशी चकमक


विशेष प्रतिनिधी

जम्मू : गेल्या 12 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर आणि जैश ए महंमदचे पाच पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले आहेत. दोन ठिकाणी ही चकमक सुरू होती आणि 12 तासांत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. काश्मीरच्या पोलीस महासंचालक, आयजीपीने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश कमांडर आणि दहशतवादी जाहिद वानी आणि पाकिस्तानचे दहशतवादी आहेत. Five Pakistani militants killed in Jammu and Kashmir Clashes with the army in two places


फारुख अब्दुल्लांचे भडकाऊ आवाहन, कृषि कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा परत मिळविण्यासाठी आंदोलन


खोऱ्यातील पुलवामा जिल्ह्यात गेल्या दिवशी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक हे ऑपरेशन करत होते. जिल्ह्यातील नियारा भागात दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या आधारावर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल चकमक सुरू झाली.

दुसरीकडे, मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पळून जाऊ नयेत, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लष्कराच्या ५३-आरआर (राष्ट्रीय रायफल्स) बडगाम पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.

Five Pakistani militants killed in Jammu and Kashmir Clashes with the army in two places

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात