वडलांनी राजकारणात संधी दिलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यानेच दिले मुलाला आव्हान, अखिलेश यादव यांना करहल मतदारसंघात द्यावी लागणार कडवी लढत


विशेष प्रतिनिधी

लखनऊ: वडलांनी आपल्या सुरक्षा अधिकाऱ्याला राजकारणात पहिली संधी दिली. त्यानेच आता मुलाला आव्हान दिले आहे. त्यामुळे मैनपुरी जिल्ह्यातील करहल मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना कडवी लढत द्यावी लागणार आहे.The boy was challenged by the security officer who was given a chance in politics by his father, Akhilesh Yadav will have to give a tough fight in Karhal constituency,

गेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणूक लढविली नव्हती. यावेळी ते करहल मतदारसंघातून लढत आहेत. भारतीय जनता पाटीर्ने मोठी खेळी खेळत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याविरुद्ध केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते एस. पी. सिंह बघेल यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे बघेल हे समाजवादी पक्षाचेच एकेकाळी नेते होते.



एकेकाळी एस. पी. सिंह बघेल हे मुलायमसिंह यादव यांचे निकटवर्तीय होते. मुलायमसिंह यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात एस. पी. सिंह हे मुलायम यांचे सुरक्षा अधिकारी होते. पोलीस दलात उपनिरीक्षक राहिलेल्या बघेल यांना मुलायम यांनीच राजकारणात पहिली संधी दिली होती. १९८९ मध्ये जलेसरमधून सपाने बघेल यांना थेट लोकसभेचं तिकीट दिलं.

त्या निवडणुकीत बघेल यांचा पराभव झाला. त्यानंतर १९९६ मध्ये ते पुन्हा जलेसरमधून लढले. तेव्हाही त्यांचा पराभव झाला. केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार १३ महिन्यात कोसळल्यानंतर मध्यावधी निवडणुका झाल्या. त्यावेळी मात्र बघेल यांनी बाजी मारली आणि जलेसरमधून ते लोकसभेवर पोहचले. या मतदारसंघातून ते दोनवेळा निवडून आले.

त्यानंतर बघेल यांनी वेगळी वाट धरली व ते बहुजन समाज पक्षात गेले. बसपाने २०१० मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठवलं तसेच पक्षाचं सरचिटणीसपदही दिलं. मात्र २०१४ च्या निवडणुकीत फिरोजाबादमध्ये सपाचे उमेदवार अक्षय यादव यांनी त्यांचा पराभव केला. पुढे राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत बघेल यांनी भाजपची वाट धरली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना टुंडला येथून उमेदवारी दिली होती.

तिथे ते जिंकले. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना स्थान मिळाले होते. मात्र, २०१९ मध्ये पक्षाने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं. आग्रा मतदारसंघातून ते लढले आणि जिंकले. गेल्या वर्षीच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात बघेल यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आहे.

बघेल आज अचानक मैनपुरी येथे दाखल झाले आणि त्यांनी करहल विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अखिलेश यादव यांनी येथे आधीच अर्ज भरला असून भाजपकडून उमेदवार कोण असणार, याबाबत सस्पेन्स ठेवण्यात आला होता.

उत्तर प्रदेशची लढाई भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. राज्यातील सत्ता राखण्याचे आव्हान असताना अखिलेश यादव आणि समाजवादी पक्ष हे भाजपपुढचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळेच उमेदवार निश्चित करताना अनेक समीकरणे लक्षात घेतली जात असून अखिलेश यांच्याविरुद्ध उमेदवार देतानाही भाजपने सर्वांनाच धक्का दिला आहे.

करहालमधून भाजपने उमेदवारच जाहीर केला नव्हता. त्यामुळे अनेक तर्क लावले जात असताना आज अचानक मैनपुरीत वेगवान घडामोडी घडल्या आणि केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून करहालच्या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बघेल यांच्या उमेदवारीने या जागेवर तुल्यबळ लढत होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

मुख्य म्हणजे अखिलेश यांनी येथून अर्ज भरताना मोठे विधान केले होते. करहालमध्ये भाजपने कुणालाही तिकीट दिलं तरी तो उमेदवार पराभूत होणार, असे ते म्हणाले होते. आता बघेल यांच्या उमेदवारीने लढाई रंगतदार झाली असून या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

The boy was challenged by the security officer who was given a chance in politics by his father, Akhilesh Yadav will have to give a tough fight in Karhal constituency,

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात