राष्ट्रपतींच्या अभिभाषणात पालखीमार्गाचा उल्लेख, केंद्र सरकार रुंदीकरण करत असल्याबद्दल केले व्यक्त समाधान


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंढरपूर तीर्थस्थळाला जोडणाºया संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मागार्चा विकास केला जाणार आहे. या पालखी मार्गांच्या रुंदीकरणाचे सौभाग्य सरकारला मिळाले आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात म्हटले आहे.Palkhi Marg was mentioned in the President’s address, expressing satisfaction over the widening of the Central Government

आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मागार्चे रुंदीकरण केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकारने या मार्गांना महामागार्चा दर्जा दिला आहे. आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर या पालखीमार्गांच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मुख्य पालखी मागार्चे रुंदीकरण, सुशोभीकरण करण्यात येत आहे.



पालखीतील वारकºयांचा प्रवास आणखी सुखकर होईल आणि पंढरपूरच्या विकासात आणि वैभवात भर पडणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग दिवेघाट ते मोहोळ असा सुमारे २२१ किलोमीटर आहे. त्यासाठी ६,७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर सासवड, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि पंढरपूरमध्ये बायपासही बनवले जातील.

वारकºयांसाठी १२ ठिकाणी पालखी विश्रांती स्थळंही विकसित करण्यात येणार आहेत. तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर पाटस ते तोंडळे-बोंडाळे असा सुमारे १३० किलोमीटरचे चौपदरीकरण आणि वारकऱ्यांसाठी पदपथाची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे ४ हजार ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या पालखी मार्गावर बारामती, बावडा, अकलुज, श्रीपूर आणि बोरगावमध्ये बायपासही बांधण्यात येतील. वारकऱ्यांसाठी ११ ठिकाणी विश्रांती स्थळं उभारली जातील. नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान मोदींनी या मार्गांचे भूमिपूजन केले.

दिल्ली – मुंबई एक्स्प्रेस वे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हा एक्स्प्रेस-वे देशातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक वेगवान एक्स्प्रेस-वे असेल, असे राष्ट्रपती म्हणाले. महामार्गाच्या कामाला २०१८ मध्ये सुरवात झाली होती. २०२३ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत हा महामार्ग सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मार्च २०२२ पर्यंत दिल्ली – जयपूर (दौसा) – लालसोट आणि वडोदरा – अंकलेश्वर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो.

देशाची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी यांना जोडणारा हा एक्सप्रेस वे जगातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे ठरणार आहे. एकूण १३८० किलोमीटर लांब असणाºया या महामार्गावर आठ लेन असतील. महामार्ग १२ लेनपर्यंत वाढवला जाऊ शकतो. या प्रकल्पासाठी जवळपास ९८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Palkhi Marg was mentioned in the President’s address, expressing satisfaction over the widening of the Central Government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात