छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा


विशेष प्रतिनिधी

रायपूर – छत्तीसगडच्या नारायणपूर येथे आयटीबीपीच्या छावणीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले. हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी एके-४७ रायफल्स, दोन बुलेटप्रूफ जॅकेट आणि वायरलेस सेट घेऊन पोबारा केला.Two soldiers killed in naxali attack

असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे आणि सहायक पोलिस निरीक्षक गुरुमुख सिंह अशी हुतात्मा जवानांची नावे असून ते आयटीबीच्या ४५ व्या बटालियनचे होते.छोटेडोंगर पोलिस ठाण्यातंर्गत आयटीबीपीची कडमेटा येथे छावणी आहे. भरदुपारी १२ च्या सुमारास आयटीपीबीच्या ४५ व्या बटालियनचे जवान गस्तीसाठी निघाले तेव्हा या छावणीजवळ नक्षलवाद्यांनी हल्ला केला.



छावणीपासून काही अंतरावर गेल्यानंतर लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यात सुधाकर शिंदे आणि गुरुमुख सिंह हुतात्मा झाले. गोळीबारानंतर नक्षलवाद्यांनी जवानांची शस्त्रे लुटून नेली. त्यात एके-४७ रायफल्स, दोन बुलेटप्रूफ जॅकेट आणि वायरलेस सेटचा समावेश होता. या घटनेची माहिती कळताच जवानांनी परिसरात झडतीसत्र राबवले. जवानांचे मृतदेह ताब्यात घेतले.

Two soldiers killed in naxali attack

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात