बिहारच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यतास पंतप्रधान मोदी यांना नितीश कुमार भेटणार


विशेष प्रतिनिधी

पाटणा – जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर बिहारचे राजकारण तापले असताना आथा त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील सारी राजकीय गणिते पुन्हा बदलणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. Nitish kumar will meet PM Naresndra Modi

या प्रश्नी राजकीय पक्षांचे म्हणणे ऐकून घेण्यातसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली असून येत्याश सोमवारी (ता.२३) ते विविध पक्षांच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत. या शिष्टमंडळाचे नेतृत्व खुद्द मुख्यमंत्री नितीश कुमार करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. चर्चेसाठी २३ ऑगस्ट रोजी वेळ दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांना धन्यवाद दिले आहेत.


बिहारच्या एक्झिट पोलमध्ये नितीश कुमार सर्वाधिक तोट्यात, तेजस्वी यादवांपुढे नितीश पडले फिके


सुरुवातीला जातीनिहाय जनगणनेचे समर्थन भाजप करीत असे. बिहार विधानसभेत यासाठी दोन वेळा प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यावेळी भाजपने पाठिंबा दिला होता. पण आता पक्षाचे भूमिका बदलली आहे. विशेष म्हणजे लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल (जेडीयू) या पक्षांचे जातीनिहाय जनगणनेला एकमत आहे. अन्य पक्षांच्या कलही त्याबाजूने आहेत.

कर्नाटकप्रमाणे बिहारमध्ये जातीवर आधारित जनगणना करण्यावर पंतप्रधानांशी चर्चा झाल्यानंतर यासंदर्भात मत व्यक्त करणार असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. जातीनिहाय जनगणनेला केंद्र सरकारने मान्यता दिली नाही, तरी राज्य हे काम करीतच राहील. ही बाब राज्याच्या अधिकार क्षेत्रातील आहे, असे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले.

Nitish kumar will meet PM Naresndra Modi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात