तृणमूल कॉँग्रेसने जनादेशाचा सन्मान राखावा, विरोधकांच्या घरांवर, कार्यालयांवर हल्ले, आयषी घोषचा आरोप

पश्चिम बंगालमध्ये प्रचंड विजय मिळविल्याने मदमस्त झालेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांकडून प्रचंड हिंसाचार सुरू झाला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (जेएनयू) विद्यार्थी संघटनेची माजी अध्यक्ष आयशी घोष हिने आरोप केला आहे की, तृणमूल कॉँग्रेसकडून प्रचंड हिसांचार सुरू झाला आहे. घरांवर आणि पक्ष कार्यालयांवर हल्ले सुरू आहेत. हे सहन केले जाणार नाही.Trinamool Congress should respect mandate, attack opposition houses, offices, accused Ayeshi Ghosh


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये प्रचंड विजय मिळविल्याने मदमस्त झालेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांकडून प्रचंड हिंसाचार सुरू झाला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (जेएनयू) विद्यार्थी संघटनेची माजी अध्यक्ष आयशी घोष हिने आरोप केला आहे की,

तृणमूल कॉँग्रेसकडून प्रचंड हिसांचार सुरू झाला आहे. घरांवर आणि पक्ष कार्यालयांवर हल्ले सुरू आहेत. हे सहन केले जाणार नाही.आयशी घोषने अनेक फोटोही ट्विट केले आहेत.



यामध्ये कार्यालयांन आणि घरांना आगी लागल्याचे दिसत आहे. आयषीने म्हटले आहे की, तृणमूल कॉँग्रेसने त्यांना मिळालेल्या जनादेशाचा सन्मान राखावा. आपल्याच नागरिकांवर हल्ले करण्यासाठी, हिंसाचार करण्यासाठी हा जनादेश मिळालेला नाही.

आपल्याच लोकांवरील हल्ले त्यांनी हल्ले करणे सोडावे. तृणमूल कॉँग्रेसचे गुंड हिंसाचार करत आहेत. घरांवर आणि पक्ष कार्यालयांवर हल्ले करत आहेत. हे सहन केले जाणार नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना वेळीच रोखावे.

जेएनयू विद्यार्थी यूनियनची माजी अध्यक्ष असलेल्या आयषी घोषने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) तिकिटावर जमुरिया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.

तृणमूल कॉँग्रेसचे हरेराम सिंग हे तेथे निवडून आले. भारतीय जनता पक्षाचे तपस कुमार रॉयही रिंगणात होते. तिरंगी लढतीत आयशीला तिसºया क्रमांकाची मते मिळाली. सुमारे ५४ हजार मतांनी तिचा पराभव झाला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचूरी यांनीही तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडगिरीचा आणि हिंसाचाराचा निषेध केला आहे. तृणमूल कॉँग्रेसकडून सुरू असलेला हिंसाचार निंदनिय असून त्याला सर्व शक्तीनिशी विरोध केला जाईल.

कोरोनाविरुध्द लढण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्याऐवजी तृणमूल कॉँग्रेस हिंसाचार करत आहे. आमच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना कोणत्याही पध्दतीची मदत करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काम करेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Trinamool Congress should respect mandate, attack opposition houses, offices, accused Ayeshi Ghosh

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात