जनजातीय गौरव; 7,287 आदिवासी गावांना मोदी सरकारची अनोखी भेट; सौर ऊर्जेद्वारे टेलीकॉम कनेक्टिविटी!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय सांस्कृतिक विकासामध्ये मोलाची भर घालणाऱ्या आदिवासींचा गौरव करण्यासाठी नुकताच 15 नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात आला. आता त्याचाच पुढचा एक भाग म्हणून केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील तब्बल 7,287 आदिवासी गावांना एक अनोखी भेट दिली आहे.Tribal pride; Modi government’s unique visit to 7,287 tribal villages; Telecom connectivity through solar energy

या सर्व आदिवासी गावांमध्ये सौर ऊर्जेद्वारे टेलीकॉम कनेक्टिविटी सुरु करण्यास केंद्र सरकारने आज मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. अश्विन वैष्णव यांनी त्याचा तपशील देखील सादर केला



एकूण 6,466 कोटी रुपये खर्च करून देशातील विविध राज्यांमधील 44 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक लाभ ओडिशातील 3,933 आदिवासी गावांना होणार असून त्याखालोखाल आंध्र प्रदेशातील 1,218 आदिवासी गावांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. त्याच बरोबर झारखंडमधील 827, छत्तीसगडमधील 699 तसेच महाराष्ट्रातील 610 आदिवासी गावांचा देखील या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

येत्या 12 ते 18 महिन्यांमध्ये या सर्व आदिवासी गावांमध्ये सौर ऊर्जेच्या तसेच टेलिकॉमच्या सर्व पायाभूत सुविधा उभारण्यात येऊन प्रत्यक्ष सेवेला प्रारंभ करण्यात येईल. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

Tribal pride; Modi government’s unique visit to 7,287 tribal villages; Telecom connectivity through solar energy

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात