जनजाती गौरव दिवस : भगवान बिरसा मुंडा हे तिहेरी संघर्षाचे जननायक!!


प्रतिनिधी

नाशिक : इंग्रज शासन, धर्मांतर करणारे मिशनरी आणि शोषण करणारे आपलेच देशबांधव अशा ‘तीनही वर्गांशी’ अथक संघर्ष करून, “उलगुलान” चा नारा देणारे, भगवान बिरसा मुंडा हे खऱ्या अर्थाने, “तिहेरी संघर्षाचे जननायक” होते असे प्रतिपादन जनजाती कल्याण आश्रमाचे प्रांत सचिव शरद शेळके यांनी केले. कॉलेज रोड नाशिक येथे आश्रमाच्या प्रांत कार्यालयात, “जनजाती गौरव दिवसाच्या” कार्यक्रमात ते बोलत होते.Tribal Pride Day: Lord Birsa Munda is the hero of triple struggle

“जनजाती गौरव दिवसाबद्दल” पुढे बोलताना, त्यांनी या दिवसाला शासनाने “राष्ट्रीय दिवस” घोषित केल्या बद्दल समाधान व्यक्त केले. केंद्र शासनाच्या पुढाकाराने बिरसा मुंडा यांचा १४ फुटी भव्य पुतळा संसदेच्या आवारात उभा केला आहे, त्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.रांचीच्या विमानतळाचे “बिरसा मुंडा” असे नामकरण असो,अथवा बिरसा यांच्या जन्मदिनी झारखंड राज्याची निर्मिती, हा समस्त “जनजाति बंधूंसाठी” सन्मानाचा क्षण असल्याचे सांगतानाच, इंग्रज शासन केवळ देहाने या देशातून गेले असून, अजूनही काही जणांची मानसिकता तशीच आहे त्यामुळे धर्मांतराचा वेग अद्याप देखील कमी झालेला नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

“भारतीय स्वातंत्र्यलढ्यात” जनजाती  समाजाच्या अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले. राघोजी भांगरे, तंट्या मामा भिल्ल, नाग्या कातकरी यांच्यासारख्या अनेक क्रांतिवीरांनी या भूमि करिता त्याग केला,त्यांच्या कार्याचे ही यथोचित स्मरण आता ‘जनजाती गौरव दिवसा’ मुळे होणार आहे.

शासनाच्या या स्तुत्य घोषणेमुळे येणाऱ्या नवीन पिढीला “जनजातीय स्वातंत्र्यसैनिकांची” नव्याने ओळख होऊन त्यांना प्रेरणा मिळेल,असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. व्यासपीठावर “कल्याण आश्रमाचे” नाशिक शहर अध्यक्ष सुजित जाजू, व प्रांत महिला कार्यप्रमुख वैशाली ताई पांचाळ उपस्थित होत्या.

कार्यक्रमास प्रांत अध्यक्ष भरत केळकर, सुनीलजी सावंत, रा. स्व. संघाचे शहर संघचालक विजयराव कदम, विभाग कार्यवाह प्रमोद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Tribal Pride Day: Lord Birsa Munda is the hero of triple struggle

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती