उत्तर प्रदेश निवडणूक : काँग्रेसला “पुश” देण्यासाठी डॉ. मनमोहन सिंगांनंतर सोनिया गांधी ऑनलाईन प्रचाराच्या मैदानात!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाब मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शेवटच्या क्षणी “राजकीय पुश” देण्यासाठी जसे पक्षाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना प्रचारात उतरवले त्याच पद्धतीने काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी या देखील उत्तर प्रदेशात मतदानाची शेवटचे तीन टप्पे राहिलेले असताना काँग्रेसच्या प्रचारासाठी ऑनलाईन मैदानात उतरल्या आहेत. To give a “push” to Congress, Dr. After Manmohan Singh, Sonia Gandhi in the online campaign arena

आज सोनिया गांधी यांनी पहिल्यांदाच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचे भाषण केले. त्या प्रत्यक्ष उत्तर प्रदेशात गेल्या नाहीत, तर त्यांनी उत्तर प्रदेशातील जनतेला ऑनलाइन संबोधित केले. सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश मधले योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशातल्या जनतेच्या हक्काचे लढाई लढणाऱ्या तब्बल ,18000 काँग्रेस कार्यकर्त्यांना योगी सरकारने तुरुंगात डांबले असले तरी काँग्रेस पक्ष लढाईचे मैदान सोडणार नाही. उत्तर प्रदेशातल्या भाजपा सरकारला घरी पाठवल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.त्याच वेळी सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाची देखील भलामण केली. प्रियंका गांधी यांनी ठरवल्याप्रमाणे खरोखर उत्तर प्रदेशात काँग्रेसने महिलांना 40% उमेदवारी दिली आहे. यामध्ये दलित, वंचित, पीडित समाजातील महिलांचा समावेश आहे, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले. समाजवादी पक्षाचे गुंडाराज आणि भाजपचे धर्मांधराज ही दोन्ही राज्ये आपल्याला नको आहेत. आपल्याला सर्वांचा समन्वय अजून विकास करणारे सरकार हवे आहे, असे त्या म्हणाल्या.

उत्तर प्रदेशाचा फक्त उरलेल्या तीन टप्प्यांमध्ये मतदान अपेक्षित आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाला “राजकीय पुश” देण्यासाठी सोनिया गांधी यांना मैदानात उतरावे लागत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पक्षाच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये प्रचार केला आहे. परंतु काँग्रेसला ते पुरेसे न वाटल्याने आधी डॉ. मनमोहन सिंग आणि नंतर दस्तुरखुद्द सोनिया गांधी यांना प्रचारात उतरावे लागल्याचे दिसत आहे.

To give a “push” to Congress, Dr. After Manmohan Singh, Sonia Gandhi in the online campaign arena

महत्त्वाच्या बातम्या