केसीआर मुंबई दौऱ्याचा परिणाम काय? तेलंगणात भाजप एक नंबर वर जाय!!; फडणवीस यांचा टोला

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या मुंबई दौऱ्याचा परिणाम काय?; तर तेलंगणात भाजप एक नंबर वर जाय,” हे उत्तर दिले आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी!! What is the outcome of KCR Mumbai tour? BJP to go to number one in Telangana !!; Tola of Fadnavis

देवेंद्र फडणवीस आज एक दिवसाच्या औरंगाबाद दौऱ्यावर आले आहे केसीआर चंद्रशेखर राव यांच्या मुंबई दौर्‍याबद्दल हा प्रश्न विचारल्यावर फडणवीस म्हणाले, की दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना भेटणे यात नवीन काही नाही. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना ते मलाही येऊन भेटले होते. तिसऱ्या आघाडीचा प्रयोगाबाबत म्हणायचे झाले तर 2019 च्या निवडणुकीपूर्वी या सर्व नेत्यांनी हातात हात घालून आघाडी केली होती. पण परिणाम काय झाला? भाजपच अधिक जागा जिंकून लोकसभेत निवडून आला. यापुढे देखील भाजपच निवडून येईल. आघाडीचा कोणताही परिणाम भाजपच्या यशावर होणार नाही.उलट तेलंगणमध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समिती पक्षाची परिस्थिती घसरत चालली आहे. तिथे सध्या भाजपचे चार खासदार आहेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप तिथे एक नंबरचा पक्ष असेल, असे भाकीतही फडणवीस यांनी वर्तविले.

What is the outcome of KCR Mumbai tour? BJP to go to number one in Telangana !!; Tola of Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या