सोनिया गांधींनी सप्टेंबर 2020 पासून थकविले 10 जनपथचे भाडे!!; आरटीआय मधून माहिती उघड


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गेल्या दीड वर्षांपासून आपले सरकारी निवासस्थान 19 जनपथचे मासिक भाडे थकविले आहे, अशी माहिती आरटीआय मधून उघड झाली आहे. Sonia Gandhi exhausted 10 Janpath fares from September 2020 !!; Disclosure of information from RTI

गुजरात मधील मीठापुरचे सुजित पटेल यांनी माहिती अधिकारा अंतर्गत केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाला दिल्लीतील सरकारी बंगल्यांच्या मासिक भाड्यासंबंधी प्रश्न विचारला होता. त्याला नागरी विकास मंत्रालयाने उत्तर दिले आहे. यामधून एक बाब स्पष्ट झाली आहे ती म्हणजे सोनिया गांधी यांनी 10 जनपथचे 4610 रूपये एवढे भाडे सप्टेंबर 2020 मध्ये शेवटचे भरले आहे. त्यानंतर हे भाडे भरण्यात आले नसल्याचे यातून दिसून येते.



सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ बंगल्या खेरीज अन्य दोन बंगल्यांच्या मासिक भाड्याची माहिती देखील नागरी विकास मंत्रालयाने सुजित पटेल यांनी विचारलेल्या प्रश्नावर आधारीत दिली आहे. नागरी विकास मंत्रालयातील सचिव रवी कुमार अरोरा हे दिल्लीतील सरकारी बंगल्यांच्या संदर्भातले अपिलेट अधिकारी आहेत. त्यांच्या हवाल्याने संजय कुमार या अधिकाऱ्याने सुजित पटेल यांना हे उत्तर पाठवले आहे. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी संबंधित पत्र आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे.

Sonia Gandhi exhausted 10 Janpath fares from September 2020 !!; Disclosure of information from RTI

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात