शिमोग्यात शाळा आणि कॉलेज पाच दिवस बंद; बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर निर्णय

वृत्तसंस्था

बंगळुरू : कर्नाटकातील शिमोगा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर ४ ते ५ दिवस शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून १४४ कलम लागू केले आहे. Schools and colleges in Shimoga closed for five days; Judgment after the murder of Bajrang Dal activist

हिजाबविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्यामुळे धर्मांधांनी हर्ष या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची चाकू भोसकून हत्या केली होती. या घटनेनंतर शहरातील वातावरण तंग बनल्याने १४४ कलम लागू केले असून शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेतकर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून हिजबावरून वाद निर्माण झाला आहे.शाळेचा गणवेश अनिवार्य असताना काही मुलींनी हिजाब घालून शाळेत आग्रह धरला होता. त्याला विरोध करण्यात आला. या प्रकरणी १० मुलींना शाळेतून निलंबित केले असून ८० मुलींवर नियमभंग प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, गृहमंत्री ज्ञानेन्द्र यांनी हर्ष याची हत्या ४ ते पाच जणांच्या टोळक्याने केल्याचे सांगितले असून कायदा आणि सूव्यवस्था नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे.

Schools and colleges in Shimoga closed for five days; Judgment after the murder of Bajrang Dal activist

महत्त्वाच्या बातम्या