अवघ्या 115 दिवसांत उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, घटनात्मक अडचण काय? पुढेच मुख्यमंत्री कोण? जाणून घ्या!

Tirath Singh Rawat Resign Know about Uttarakhand Political Crisis And Why CM Tirath Singh Rawat Resigned

Tirath Singh Rawat Resign : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी शुक्रवारी रात्री 11.15 वाजता राज्यपाल बेबी राणी मौर्य यांना आपला राजीनामा सादर केला. ते केवळ 115 दिवस मुख्यमंत्रिपदी राहिले. यापूर्वी 2002 मध्ये भाजपचे भगतसिंह कोश्यारी हे 123 दिवस मुख्यमंत्री होते. Tirath Singh Rawat Resign Know about Uttarakhand Political Crisis And Why CM Tirath Singh Rawat Resigned


विशेष प्रतिनिधी

डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी शुक्रवारी रात्री 11.15 वाजता राज्यपाल बेबी राणी मौर्य यांना आपला राजीनामा सादर केला. ते केवळ 115 दिवस मुख्यमंत्रिपदी राहिले. यापूर्वी 2002 मध्ये भाजपचे भगतसिंह कोश्यारी हे 123 दिवस मुख्यमंत्री होते.

राजीनामा दिल्यानंतर रावत म्हणाले की, घटनात्मक पेचप्रसंगामुळेच मी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी हाय कमांडच्या आदेशानुसार राजीनामा दिला आहे. पुढील मुख्यमंत्री आमदार असतील, असे त्यांनी सांगितले. शनिवारी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल.

पत्रकार परिषदेत राजीनाम्याविषयी उल्लेख नाही

तत्पूर्वी, रावत यांनी रात्री 10.45 वाजता पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामगिरीविषयी माहिती दिली. त्यांच्या राजीनाम्याबद्दल पत्रकारांनीही त्यांना प्रश्न केले, पण ते काही उत्तर न देता निघून गेले.

यापूर्वी असे म्हटले जात होते की तीरथसिंग रावत यांनी आपला राजीनामा भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना सादर केला आहे. राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून आता धनसिंग रावत आणि सतपाल महाराजांची नावे चर्चेत आहेत. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना भाजपने राज्याचे केंद्रीय निरीक्षक केले आहे. शनिवारी ते बैठकीस उपस्थित राहतील.

आठवडाभरापासून तीरथ यांना हटवण्याची चर्चा

गेल्या एक आठवड्यापासून असा अंदाज वर्तविला जात होता की उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलू शकतात. त्यांच्या राजीनाम्यामागील कारण घटनात्मक पेचप्रसंग असल्याचे सांगितले जात होते. ते अद्याप राज्यातील कोणत्याही मतदारसंघाचे आमदार नव्हते. मुख्यमंत्री म्हणून कायम राहण्याच्या बाबतीत ही अडचण होती. बुधवारी भाजपने रावत यांना दिल्लीत बोलावले. तेथे गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी त्यांची भेट घेतली.

साडेतीन महिन्यांत खुर्ची गेली

मुख्यमंत्री झाल्यानंतर सातत्याने वादग्रस्त विधान करणारे तीरथसिंग रावत यांचे साडेतीन महिन्यांत पद गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने त्यांना दिल्ली येथे बोलावून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना राजीनामादेखील सोपवला.

कुंभदरम्यान तीरथसिंग रावत यांनी ज्या पद्धतीने जमावाला एकत्र येऊ दिले आणि कोरोना तपासणीच्या नावावर झालेल्या घोटाळ्यात त्यांच्या जवळच्या मित्रांची नावे आली, तेव्हा त्यांची स्थिती अधिकच बिकट झाली. असं असलं तरी, तीरथ ज्या पद्धतीने काम करत होते, त्यामुळे आगामी निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता जास्त होती. तथापि, भाजप तीरथ यांना केंद्रातही पद देऊ शकते, कारण ते पौरी गढवाल मतदारसंघातील खासदारही आहेत.

मुख्यमंत्रिपदासाठी सतपाल महाराजांचे नाव आघाडीवर

नवीन मुख्यमंत्रिपदासाठी भाजप आता बाहेरून कोणाला आणण्याऐवजी आमदारांमधून निवड करण्याच्या बाजूने आहे. सध्या सतपाल महाराज यांचे पारडे जड असल्याचे दिसते. माजी मुख्यमंत्री त्रिवेन्द्रसिंग रावतदेखील पूर्ण जोर देत आहेत, परंतु त्यांना आमदारांचा पाठिंबा मिळणे कठीण जात आहे.

सतपाल महाराज, धनसिंग यांच्यासह 4 ज्येष्ठ आमदारांच्या नावाची राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्यांसाठी चर्चा आहे. त्यापैकी राज्याचे पर्यटन, सांस्कृतिक व पाटबंधारे मंत्री सतपाल महाराज यांचे नाव अग्रभागी आहे. ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही आहेत. सतपाल मानव उत्थान सेवा समितीचे संस्थापक आहेत. या समितीची सुमारे 3 हजार आश्रम आहेत.

देवस्थानम बोर्ड तयार करण्यात आणि चार धाम भागातील आमदारांना मंडळाचे सदस्य म्हणून घेण्यावरून वाद झाले. यावर चारधामचे पुजारी संतप्त झाले. त्रिवेंद्रसिंग रावत यांनी मुख्यमंत्री असताना हे पाऊल उचलले होते. या असंतोषावर विजय मिळवण्यासाठी भाजप सतपाल महाराजांना पद देऊ शकते. कारण त्यांचा धार्मिक समाजात प्रभाव आहे.

तीरथसिंग रावत यांची घटनात्मक अडचण काय होती?

त्रिवेन्द्रसिंग रावत यांच्या राजीनाम्यानंतर 10 मार्च रोजी तीरथसिंग रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता घटनेनुसार पौरी गढवाल येथील भाजपा खासदार तीरथ यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभा पोटनिवडणूक जिंकायची होती, तरच त्यांना मुख्यमंत्रिपदी राहता आले असते. म्हणजेच 10 सप्टेंबरपूर्वी त्यांना आमदार होणे भाग होते. काही वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे की, तीरथ सिंह गंगोत्रीकडून निवडणूक लढवतील. त्यांच्याविरोधात आम आदमी पक्षाने आपले उमेदवार कर्नल अजय कोठियाल यांनाही उभे केले होते.

निवडणूक आयोगाने सप्टेंबरपूर्वी पोटनिवडणूक घेण्यास नकार दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रावत यांना आमदार होण्याच्या घटनात्मक संकटाचा सामना करावा लागला. सहा महिने पूर्ण होण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला असता आणि पुन्हा शपथ घेतली असती, तरी पुढच्या वर्षी लवकर विधानसभा होण्यापूर्वी भाजपला तसे करणे योग्य वाटले नाही.

उत्तराखंड पोटनिवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोग अद्याप निर्णय घेणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या निवडणुका कोरोना संसर्गाच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Tirath Singh Rawat Resign Know about Uttarakhand Political Crisis And Why CM Tirath Singh Rawat Resigned

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात