न्यूयॉर्क टाइम्समध्ये पत्रकारितेची संधी, पात्रता – हिंदूविरोधी, मोदीविरोधी, अँटी इंडिया स्टोरीज! वाचा सविस्तर…

NYT recruiting Anti Hindu anti Modi correspondent For Anti India Propaganda Read Details

NYT recruiting Anti Hindu : जगप्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्स (NYT)जे हिंदुफोबिक कंटेंटमुळे अनेकदा वादात सापडले आहे, आता नोकरी भरतीदरम्यानही उघडपणे हिंदू द्वेष दाखवताना दिसत आहे. या वृत्तपत्राने 1 जुलै 2021 रोजी लिंक्डइनवर नोकरभरतीची पोस्ट केली. ही नोकरी दिल्लीत साऊथ एशिया कॉरस्पांडंटची आहे. यामध्ये नोकरीच्या अटी पाहता असे दिसते की, हिंदूविरोधी किंवा मोदीविरोधी असणे हीच याची पात्रता असणार आहे. NYT recruiting Anti Hindu anti Modi correspondent For Anti India Propaganda Read Details


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्स (NYT)जे हिंदुफोबिक कंटेंटमुळे अनेकदा वादात सापडले आहे, आता नोकरी भरतीदरम्यानही उघडपणे हिंदू द्वेष दाखवताना दिसत आहे. या वृत्तपत्राने 1 जुलै 2021 रोजी लिंक्डइनवर नोकरभरतीची पोस्ट केली. ही नोकरी दिल्लीत साऊथ एशिया कॉरस्पांडंटची आहे. यामध्ये नोकरीच्या अटी पाहता असे दिसते की, हिंदूविरोधी किंवा मोदीविरोधी असणे हीच याची पात्रता असणार आहे.

काय आहे पात्रता?

आपल्या जाहिरातीद्वारे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, उमेदवार असा असावा की त्याने भारत सरकारच्या विरोधात लिखाण करावे आणि सत्ता बदलण्याच्या प्रयत्नांमध्ये हातभार लावावा. या जॉब पोस्टिंगमध्ये वृत्तपत्राने असेही लिहिले आहे की, जरी लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला स्पर्धा देत आहे, परंतु तरीही जागतिक मंचावर डंका पिटण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.

एनवायटीचा दुष्ट हेतू

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चीनविरुद्धच्या पुढील कारवाईला भारताचे नाटक म्हटले गेले आहे, जे त्यांच्या मते सीमा आणि राष्ट्रीय राजधानींमध्ये चालू आहे. जॉब पोस्टकडे पाहत असताना आणि भारत आणि भारत सरकारसाठी वापरलेले शब्द पाहून असे दिसते की, जणू या वृत्तपत्राला भारताची अडचण आहे. हे सर्व शब्द न्यूयॉर्क टाइम्सचा दुष्ट हेतू स्पष्ट करतात.

चीनची एनवायटीवर दौलतजादा

या जॉब पोस्टिंगसह भारतासाठी वापरली जाणारी भाषा पाहता चीन सरकारचा यावर काय परिणाम होईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चीन सरकारच्या मुखपत्राने अमेरिकन वृत्तपत्रांना केवळ जाहिराती इत्यादींसाठी 19 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 142 कोटी) दिले आहेत, तेही केवळ 4 वर्षांच्या काळात!

अमेरिकी वृत्तपत्रांवर चीनचा प्रभाव

एक चिनी वृत्ताने न्याय विभागात दाखल केलेल्या दस्तऐवजानुसार, कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राने वॉल स्ट्रीट जर्नल (WSJ)ला $6 मिलियन (₹447,367,458), वाशिंग्टन पोस्टला $4.6 मिलियन (₹342,981,717.80), फॉरेन पॉलिसीला $2,40,000 (₹17,894,698), न्यूयॉर्क टाइम्सला $50,000 (₹3,728,062)पेक्षा अधिक रक्कम दिली आहे. दुसरीकडे, डेस मोइनेस रजिस्टरला $34,600 (₹2,579,819) आणि CQ-रोल कॉलला $76,000 (₹5,666,654) देण्यात आले.
याशिवाय कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राने ट्विटरवर जाहिरातींसाठी 2,65,822 डॉलर (₹19,820,018) खर्च केले होते.

अशा प्रकारे 2018 मध्ये न्यूयॉर्क टाइम्स आणि वाशिंगटन पोस्ट दोन्हींमध्ये एक प्रायोजित वृत्त छापण्यात आले. ज्याचे शीर्षक “बेल्ट एंड रोड अलाइन विथ आफ्रिकन नेशन्स” होते. या वृत्तासोबत एक आणखी वृत्त छापण्यात आले होते, ज्यात ट्रम्प प्रशासनावर टीका करण्यात आली होती. चीनने अशा वार्तांकनासाठी परदेशी माध्यमांचा वेळोवेळी आपल्या हितासाठी वापर केलेला आहे. चीनवर यूएस टॅरिफ वाढल्याने अमेरिकेत घर बांधणे महाग होईल, हे दाखवण्याचा याद्वारे प्रयत्न झाला आहे.

भारत, हिंदू, मोदीद्वेषासाठी एनवायटीची ख्याती

आता न्यूयॉर्क टाइम्सचा भारताबद्दलचा द्वेष आणि येथे दुसऱ्यांदा लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलचा द्वेष काही नवीन नाही. यापूर्वीही असे अनेक प्रयत्न झाले. जॉब पोस्टमध्ये चीनबरोबर भारताची तुलना करणे आणि त्यामध्ये भारताची बदनामी करणेदेखील या संपूर्ण प्रोपगेंडाचा पर्दाफाश करते. यावरून या परदेशी वृत्तपत्राचा द्वेष पसरवायचा हेतू स्पष्ट होत आहे.

वादग्रस्त जॉब पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान मोदी देशाच्या हिंदू बहुल लोकांवर लक्ष केंद्रित करून आत्मनिर्भर भारत आणि मस्क्युलर राष्ट्रवादाचा पुरस्कार करतात. आता हे वाक्य किती विचित्र आहे ते पाहा. न्यूयॉर्क टाइम्सला अशी समस्या आहे की, भारत आत्मनिर्भर होत आहे किंवा ही भारताच्या चीनबरोबर घटत असलेल्या व्यापारामुळे एनवायटीला पोटदुखी होतेय.

न्यूयॉर्क टाइम्स नेहमीच जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचे कर्तृत्व नाकारत आले आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रमानंतर एनवायटीने वर्णद्वेषाचे व्यंगचित्रही प्रकाशित केले होते आणि नंतर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.

NYT recruiting Anti Hindu anti Modi correspondent For Anti India Propaganda Read Details

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात