Thomas Cup Win : 14 वेळच्या विजेत्या इंडोनेशियाचा पराभव करून भारताने रचलेल्या इतिहासाची गोष्ट!!


वृत्तसंस्था

बँकॉक : जागतिक बॅडमिंटन खेळात सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या थॉमस कप स्पर्धेत भारताने सत्तर वर्षांनंतर इतिहास रचला आहे. थॉमस कप २०२२ च्या फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटन संघाने सलग तिसऱ्या सामन्यात गतविजेत्या इंडोनेशियाचा पराभव करून थॉमस कप २०२२ चे विजेतेपद पटकावले आहे. भारताने ऑलिंपिक मधल्या खेळांवर प्रशिक्षणापासून ते सुविधांपर्यंत खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित केल्याचे हे फळ मिळाले आहे. The story of the history made by India by defeating 4 time winners Indonesia

थॉमस कपच्या 70 वर्षांच्या इतिहासात भारत कधीच फायनल पर्यंत गेला नव्हता. 1952, 1957 आणि 1979 या तीन वर्षात भारत फक्त सेमीफायनल पर्यंत पोहोचला होता. परंतु इंडोनेशिया, तैवान आधी देशांकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता. 2022 मध्ये पहिल्यांदाच भारत थॉमस कप स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला आणि भारतीय टीमने प्रत्येक सामने जिंकत 14 वर्षे चॅम्पियन राहिलेल्या इंडोनेशियाला पराभवाची धूळ चारली. या अर्थाने भारतीय बॅडमिंटन खेळाच्या इतिहासात सध्याच्या टीमने आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदविले आहे.

  •  भारताने पहिले तीन सामने जिंकून १४ वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा एकतर्फी ३-० असा पराभव केला. भारतासाठी, लक्ष्य सेनने पुरुष एकेरीत, सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने पुरुष दुहेरीमध्ये आणि किदाम्बी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात आपापले सामने जिंकले. यासह भारताने प्रथमच थॉमस कप विजेतेपद पटकावले आहे.
  • – पहिल्या सामन्यात त्यांनी पुरुष एकेरी गटात जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकाचा शटलर लक्ष्य सेन आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या अँथनी सिनिसुका गिंटिंगचा पराभव केला.
  •  दुसऱ्या सामन्यात सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने पुरुष दुहेरी गटात इंडोनेशियन जोडी केविन संजय आणि मोहम्मद अहसान यांचा पराभव केला.
  •  तिसऱ्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीचा पराभव करत भारताला प्रथमच थॉमस कपचे चॅम्पियन बनवले.
  •  पुरुष एकेरी विभागात गिंटिंगने लक्ष्य सेनविरुद्ध धमाकेदार सुरुवात करत पहिला गेम २१-८ असा जिंकला, पण दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यने जोरदार पुनरागमन करत दुसरा गेम २१-१७ असा जिंकून २-२ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. दोन्ही खेळाडू एकदा १२-१२ ने बरोबरीत होते. पण लक्ष्याने ४ गुणांची आघाडी घेत स्कोअर १८-१४ वर नेला आणि त्यानंतर तिसरा आणि निर्णायक गेम २१-१७ असा जिंकून भारताला सामन्यात १-० अशी आघाडी मिळवून दिली. लक्ष्यने गिंटिंगला एक तास ५ मिनिटांत हरवले.
  •  भारताने या मोसमात चायनीज तैपेईविरुद्ध फक्त एकच सामना गमावला, तर १४ वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाने एकही सामना गमावला नाही. इंडोनेशियाने बाद फेरीत चीन आणि जपानला नमवून अंतिम फेरी गाठली होती.
  •  दुसऱ्या सामन्यात, पुरुष दुहेरी गटात सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा सामना केविन संजय आणि मोहम्मद अहसान या इंडोनेशियन जोडीशी झाला. पहिल्या गेममध्ये अवघ्या १८ मिनिटांत भारतीय जोडी १८-२१ अशी पराभूत झाली.
  •  बँकॉक येथील इम्पॅक्ट एरिना येथे झालेल्या सामन्याच्या दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने दमदार पुनरागमन केले आणि एका क्षणी गुणसंख्या ११-६ अशी नेली. मात्र, या दोन्ही जोडीतील दुसरा गेम २१-२१ असा बरोबरीत सुटला. त्यानंतर रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने दुसरा गेम २३-२१ असा जिंकला.
  •  तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने पुन्हा एकदा ११-९ अशी आघाडी घेतली. पण पुढच्या काही मिनिटांतच इंडोनेशियन जोडीने स्कोअर ११-११ असा बरोबरीत आणला. यानंतर एकदा दोन्ही जोडीने स्कोअर १७-१७ असा बरोबरीत आणला. त्यानंतर भारतीय जोडीने २०-१८ अशी आघाडी घेत एक तास १३ मिनिटांत सामना २१-१९ असा जिंकला. रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीच्या विजयासह भारतीय संघाने सामन्यात २-० अशी आघाडी घेतली.
  •  पुरुष एकेरी गटात किदाम्बी श्रीकांत आणि जोनाथन क्रिस्टी यांच्यात तिसरा सामना झाला. पहिल्या गेममध्ये श्रीकांतने जोनाथनविरुद्ध १४-१० अशी आघाडी घेतली होती. श्रीकांतने येथून पुन्हा १९-१५ अशी आघाडी घेतली आणि पहिला गेम २१-१६ असा जिंकला.
  •  दुसऱ्या गेममध्येही श्रीकांत १२-८ ने पुढे होता. यानंतर दोन्ही खेळाडू २१-२१ असे बरोबरीवर आले. त्यानंतर श्रीकांतने सलग दुसरा गेम ४३ मिनिटांत २३-२१ असा जिंकून भारताला सलग तिसऱ्या सामन्यात ३-० असा विजय मिळवून देत इतिहास रचला.

The story of the history made by India by defeating 4 time winners Indonesia

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात