जनतेशी संपर्क तुटण्याची कबुली देत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधींच्या तोफा एकाच वेळी भाजप आणि प्रादेशिक पक्षांवर सुटल्या. उदयपूरच्या चिंतन शिबिरात राहुल गांधींच्या भाषणाची प्रचंड उत्सुकता होती. राहुल गांधी आपल्या भाषणातून काँग्रेस पक्षाला दिशा देणार. त्यातून पक्षात नवचैतन्य मिळणार, अशा अपेक्षा काँग्रेसजनांनी ठेवल्या. राहुल गांधी भाजप आणि प्रादेशिक पक्षांवर तोफा डागत काँग्रेसजनांच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. मात्र त्याच वेळी जनतेशी काँग्रेस यांचा संपर्क तुटला आहे. तो पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी वरिष्ठ – कनिष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन बसावे, असे परखड बोल देखील राहुल गांधी यांनी सुनावले. Rahul Gandhi’s guns on BJP and regional parties at the same time, admitting that he lost contact with the people
– संसदेतले आक्रस्ताळे भाषण नव्हे
राहुल गांधींचे भाषण संसदेतल्या आक्रस्ताळ्या भाषणा सारखे नव्हते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये कुठेही गांधी – सावरकर वगैरे वादग्रस्त मुद्द्यांचा उल्लेख केला नाही. त्यांनी आपल्या भाषणातला भर काँग्रेस नेते कार्यकर्ते आणि जनता यांच्या मुद्द्यावर ठेवला. देशभरात भाजप आणि संघ धर्मा – धर्मा मध्ये जाती – जातीमध्ये प्रांता – प्रांतात मध्ये फूट पाडून द्वेष फैलावत आहे. त्यातून देशात आग लागू शकते. कोविड जसा भाजपा सरकारला रोखता आला नाही, ही तशी ही आग देखील भाजप सरकारला रोखता येणार नाही. ते काम काँग्रेसलाच करावे लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेसचे नेते कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करतील. युवकांना बेरोजगारी पासून मुक्त करण्यासाठी आणि जनतेला महागाईपासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारशी संघर्ष करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
– प्रादेशिक पक्षांच्या मर्यादा
प्रादेशिक पक्षांचे या देशाच्या राजकारणात जरूर स्थान आहे, परंतु ते फार मर्यादित आहे. भाजपसारख्या बलाढ्य पक्ष संघटनेची प्रादेशिक पक्ष लढू शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे विचारधारा नाही. भाजपशी लढण्याची मजबूत विचारधारा फक्त काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाकडे आहे. त्यामुळे आपण काँग्रेसजन एकत्रितपणे भाजपचा यशस्वी मुकाबला करू शकतो तेवढा यशस्वी मुकाबला प्रादेशिक पक्ष करू शकत नाही असा टोला राहुल गांधी यांनी प्रादेशिक नेत्यांना लगावला. प्रादेशिक पक्ष केवळ एका जातीचे अथवा एका व्यक्तीचे आहेत असे शरसंधान देखील त्यांनी साधले.
– पचमढी सारखे एकला चलो रे भूमिका
राहुल गांधी यांच्या भाषणात एकाच वेळी भाजप आणि प्रादेशिक पक्षांवर शरसंधान राहिल्याने काँग्रेस आता पचमढी सारख्या “एकला चलो रे” च्या भूमिकेवर पुन्हा जाते आहे, असेच दिसून येत आहे. काँग्रेसने अधिकृतरीत्या पचमढी ठरावा मध्ये प्रादेशिक पक्षांची आघाडी अथवा युती करायची नाही, अशी घोषणा केली होती. परंतु यावेळी उदयपूर चिंतन शिबिरात तशी औपचारिक घोषणा केली नसली तरी जनतेशी संघर्ष या मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर भाजपला एकमेव पर्याय बनवून राहू इच्छिते हाच मुद्दा अधोरेखित होतो आहे. राहुल गांधी यांच्या भाषणात देखील याच मुद्द्याचे ठळक प्रतिबिंब पडले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more