गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र बंडखोरीच्या पवित्र्यात, पणजीतून तिकिट मिळाले नाही तर….


विशेष प्रतिनिधी

पणजी: गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर बंडखोरीच्या पावित्र्यात आहे. पणजीतून विधानसभेचे तिकीट न दिल्यास कठोर निर्णय घेण्या भाग पाडू नका, असा इशारा त्यांनी दिला आहे. ते लवकरच राहुल गांधींची भेट घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.The son of the late Goa Chief Minister Manohar Parrikar in the sanctity of rebellion, if he did not get a ticket from Panaji ….

दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी २५ वर्षे पणजीचे प्रतिनिधित्व केले. उत्पल पर्रीकर यांनीही आपल्याला येथूनच तिकीट मिळेल, असा पूर्ण विश्वास असल्याचे सांगत म्हटले आहे की,आपण पक्षाला आधीच सांगितले आहे. मला पणजीतून निवडणूक लढवायची आहे. पक्ष मला तिकीट देईल, याची मला खात्री आहे. सध्या येथील अंटानासिओ मोन्सेरटो हे आमदार आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ते येथून विजयी झाले आणि नंतर भाजपमध्ये दाखल झाले.



तिकीट न मिळाल्यास काय करणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. मला सध्या या विषयावर बोलण्याची गरज नाही. मनोहर पर्रीकर यांना आयुष्यात सहजासहजी काही मिळाले नाही. त्याचप्रमाणे मलाही हव्या असलेल्या गोष्टींसाठी खूप मेहनत करावी लागेल. कठोर निर्णय घेण्यास आपल्याला भाग पाडले जाऊ शकते. असे निर्णय घेण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना. जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा मी जनतेचे ऐकेन. मी पक्षाला सांगितले आहे. पक्ष मला तिकीट देईल, याची मला खात्री आहे, असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस आधी गोव्याचे तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या जागी प्रमोद सावंत यांची गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली होती. दरम्यान, पर्रिकर यांचे पुत्र उत्पल हे पर्रिकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे वृत्त होते. मात्र तेव्हा त्यांना उमेदवारी दिली गेली नव्हती.

आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून लढावे, अशी मागणी भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांकडून होत होती. तसेच उत्पल पर्रिकरही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, अशी चर्चा आहे.दरम्यान, २०१९ पासून उत्पल हे भाजपामध्ये नाराज असून, मनोहर पर्रिकर यांनी राजकारणामध्ये जो विश्वासाचा मार्ग स्थापन केला होता,

तो १७ मार्च २०१९ मध्ये संपुष्टात आला, असे विधान उत्पल यांनी तेव्हा केले होते. आता उत्पल पर्रिकर हे काँग्रेसच्या वाटेवर असून, ते लवकरच राहुल गांधींची भेट घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर हे पुढच्या काळात कोणता राजकीय मार्ग निवडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

The son of the late Goa Chief Minister Manohar Parrikar in the sanctity of rebellion, if he did not get a ticket from Panaji ….

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात