डॉक्टरांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांकडून मास्क घालण्याचा सल्ला दिला जात असताना देशातील ५० टक्के लोक अजूनही मास्क घालत नाहीत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. मास्क घालणाऱ्यां पैकीही अनेक जण फक्त चेहराच झाकतात, नाक उघडे ठेवतात. काहींचा मास्क तर हनुवटीवर आलेला असतो, असेही दिसून आले आहे.The peak of negligence, 50% of the people in the country still do not wear masks, only 14% of those who wear masks use them properly.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: डॉक्टरांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांकडून मास्क घालण्याचा सल्ला दिला जात असताना देशातील ५० टक्के लोक अजूनही मास्क घालत नाहीत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.
मास्क घालणाºयांपैकीही अनेक जण फक्त चेहराच झाकतात, नाक उघडे ठेवतात. काहींचा मास्क तर हनुवटीवर आलेला असतो, असेही दिसून आले आहे.
देशात कोरोनाची दुसरी लाट कहर करत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने एक नव्हे तर डबल मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, लोकांचा निष्काळजीपणा कमी होण्याची चिन्हे नाहीत. देशातील लाखो लोकांचा कोरोनाने जीव गेला असला तरी इतरांनी त्यापासून धडा घेतलेला नाही.
देशात सर्वच ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क न वापरणाºयांवर दंडही आकारला जातो. मात्र, केंद्र सरकारनेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तब्बल अर्धा देश म्हणजेच 50 टक्के लोक मास्क वापरतच नाही.
एका सर्वेक्षणाच्या हवाल्याने केंद्र सरकारने इंडिया फाईट्स कोरोना या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही आकडेवारी शेअर केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचं महाभयंकर संकट असलं तरी 50 टक्के लोक आताही मास्क वापरतच नाहीत.
फक्त 14 टक्के लोक हे मास्क नीट लावत आहेत. मास्क लावणाºयांपैकी 64 टक्के भारतीय मास्क तोंडावर लावतात. पण नाक उघडंच ठेवतात. त्यानंतर 20 टक्के भारतीय मास्क घालतात, पण तो तोंडावर नसून हनुवटीवर घालतात.
दोन टक्के भारतीय तर मास्क हनुवटीवरही न लावता थेट गळ्यावर ठेवतात. फक्त 14 टक्के भारतीय योग्य प्रकारे मास्क लावतात. शास्त्रीय पध्दतीने यामध्ये मास्कद्वारे नाक, तोंड, हनुवटी झाकली गेलेली असते.
देशभरातील 25 शहरांमधील 2000 लोकांवर हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यापैकी नमुना पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डबल मास्क लावण्याचा सल्ला दिला जात आहे. पण लोक एकही मास्क लावत नसल्याचे उघड झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App