मास्कशिवाय फिरणाऱ्यांना खाकीचा हिसका ; साडेतीन लाख जणांकडून १७ कोटीचा दंड वसूल


वृत्तसंस्था

पुणे : शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. सुमारे 3 लाख 55 हजार जणांवर कारवाई करून सुमारे 17 कोटी 85 लाख रुपयांचा दंड वसूल केला. Pune police Taken Strong Action Against The Person Those Who Are Not Wearing Mask’s. About 17 crore rupees collected as fine

मास्क घातला नाही तर कारवाई केली जाईल, असा इशारा देऊनसुद्धा अनेकांनी पुणेरी बाणा दाखवला. त्याला पोलिसांनी खाकीची ताकद दाखवली आणि कारवाई करून दंड वसूल केला आहे
शहरात दररोज दोन ते तीन हजारांवर लोक माकशिवाय फिरतात.



त्यानुसार पोलिसांना मागील वर्षभरात तब्बल 3 लाख 54 हजारांवर बेशिस्त नागरिकांकडून 17 कोटी 85 लाखांची वसुली केली आहे. अनेकांकडून सोशल डिस्टन्सचे उल्लंघन, मास्कशिवाय प्रवास, सॅनिटायझरचा वापर न करीत सर्रासपणे आरोग्य विभागाच्या सूचनांचे उल्लंघन केले जात आहे. त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्यांकडून प्रत्येकी 500 रुपये दंडाच्या कारवाईचा वेग वाढविला आहे. दरम्यान, कारवाई वरून पोलिस आणि नागरिकांमध्ये वादावादी होत आहे.

पुणे शहरातील कोरोना संक्रमित रुग्णसंख्येचा आलेख वाढला आहे. त्यामुळे नियम तोडणाऱ्यांवर आदेश होते. त्यानुसार 2 सप्टेंबर 2020 पासून पोलिसांनी कारवाई केली. मध्यंतरी कारवाई थंडावली होती. मात्र, एप्रिल 2021 पासून रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे मास्क नसलेल्या नागरिकांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे.

Pune police Taken Strong Action Against The Person Those Who Are Not Wearing Mask’s. About 17 crore rupees collected as fine

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात