देशात विरोधी पक्ष प्रबळ असता, तर शेतकऱ्यांना रस्त्यावर का बसायला लागले असते??; राकेश टिकैतांचा ममतांच्या आडून काँग्रेसवर निशाणा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनाच्या ५०० व्या दिवसानंतर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत जोरात सक्रीय झालेत. काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकात्यात जाऊन भेट घेतल्यानंतर ते भलतेच फॉर्मात आलेत. the Opposition in the country is weak. We’re sitting on streets now, had the Opposition been strong we need not have done that. Opposition should be strong, we told her this: Rakesh Tikait

ममतांच्या भेटीनंतर राकेश टिकैतांनी केंद्रातील मोदी सरकारपेक्षा विरोधी काँग्रेसवरच जोरदार निशाणा साधला आहे. या देशात विरोधक बळकट पाहिजे. दिल्लीत प्रबळ विरोधक असते, तर आम्हा शेतकऱ्यांना इतके दिवस दिल्लीतल्या रस्त्यांवर कशाला बसायला लागले असते??, असा तिखट सवाल राकेश टिकैत यांनी काँग्रेसला उद्देशून विचारला आहे. ममता बॅनर्जी यांना भेटायला का गेलात?, या पत्रकारांच्या प्रश्नाला टिकैत यांनी ताडकन उत्तर दिले. ते म्हणाले, की आम्ही काय अफगाणिस्तानच्या अध्यक्षांना भेटायला गेलो होता का? की ज्यासाठी पासपोर्ट लागावा आणि केंद्र सरकारची परवानगी मागावी… आम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. तृणमूळ काँग्रेसच्या अध्यक्षांना नाही.

आणि इथून पुढे प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेतकरी आंदोलनाचे नेते भेटणार आहेत. मग ते भाजपचे मुख्यमंत्री असोत की विरोधी पक्षांचे पक्षांचे मुख्यमंत्री, आम्ही प्रत्येक मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि शेतकऱ्यांची भूमिका सांगणार आहोत, असे राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले.

देशात प्रबळ विरोधी पक्ष असता, तर शेतकऱ्यांना असे रस्त्यावर बसायला लागले नसते. विरोधी पक्ष प्रबळ हवा आहे, हे आम्ही ममता बॅनर्जींना सांगितले आहे, असे टिकैत म्हणाले.

the Opposition in the country is weak. We’re sitting on streets now, had the Opposition been strong we need not have done that. Opposition should be strong, we told her this: Rakesh Tikait

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात