अयोध्येतील राम मंदिराचा मुहूर्त ठरला!!; फेब्रुवारी 2024 मध्ये दर्शनासाठी खुले!!


प्रतिनिधी

नाशिक : अयोध्येतील बहुप्रतिक्षीत अशा राम मंदिराला आता मुहूर्त मिळाला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये राम मंदिर हे सर्व भाविकांना दर्शनासाठी खुले होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांनी नाशिक मध्ये माहिती दिली आहे. त्यामुळे आता अयोध्येतील राम जन्मभूमीच्या दर्शनाचा मार्ग भाविकांसाठी मोकळा होणार आहे. The moment of Ram temple in Ayodhya came to an end !!; Open for Darshan in February 2024

2024 मध्ये होणार प्रतिष्ठापना

फेब्रुवारी 2024 मध्ये नव्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 2024 पर्यंत मंदिराचा पहिला मजला, गर्भगृहाचे काम पूर्म करण्यात येणार असून, भाविकांच्या दर्शनासाठीची व्यवस्था पूर्ण करणार असल्याचे रामजन्मभूमी न्यासाकडून सांगण्यात येत आहे. त्याचवेळी दुसरीकडे राम मंदिराचे बांधकाम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

2025 पर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2019 मध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीवर अंतिम निर्णय दिला. त्यानंतर 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. 2025 पर्यंत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे. पण त्याआधी भाविकांना राम मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय रामजन्मभूमी न्यासातर्फे घेण्यात आल्याचे गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले आहे.

The moment of Ram temple in Ayodhya came to an end !!; Open for Darshan in February 2024

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात