विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : मराठा रेजिमेंटने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट पाकिस्तानच्या सीमेवर उभारला आहे. काश्मीरच्या मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित करण्यात आली आहे. ही प्रतिकृती १४ हजार ८०० फूट उंचावरआहे. जगात प्रथमच महाराजांची प्रतिकृती इतक्या उंचावर बसविण्यात आली आहे.The Maratha Regiment raised the statue of Shivaji Maharaja on border
हातात तलवार घेऊन घोड्यावर विराजमान असलेले शिवाजी महाराजांची ही प्रतिकृती थेट सैन्यदलातील मावळ्यांसोबत नंगा पर्वताकडे पाहत शत्रूवर नजर ठेवत असल्याचे हया मुर्तीकडे पाहून वाटते. मच्छल या गावात सैन्यदलाच्या वतीने महाराजांच्या दोन प्रतिकृत्या स्थापित करण्यात आल्या आहेत. या दोन्ही प्रतिकृती पुण्यातील २५ वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारल्या आहेत.
मच्छल बटालियनचे कर्नल प्रणय पवार यांच्या कल्पनेतून ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या मूर्तीच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमधील नागरिकांना देखील शिवाजी महाराजांची माहिती मिळत आहे. कर्नल पवार यांनी सांगितले, मराठा समाजाला एकत्र करत स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत
. शिवाजी महाराजांनी शत्रूला आपल्या युद्धनीती आणि धाडसी कर्तृत्वाने पळवून लावले. त्यांच्या मावळ्यांची फौजेप्रमाणे आज लष्कराचे सैन्य देखील सीमेवर शत्रूशी लढत आहे. शिवाजी महाराज हे प्रेरणेचे केंद्र आहेत. गेल्या १४ वर्षांपासून मराठा रेजिमेंट काश्मीर खोऱ्यात सीमेवर तैनात आहे.
शत्रूशी लढणाऱ्या या जवानांना महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये दररोज मिळत राहावे या अनुषंगाने मच्छल येथे शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित करण्याची कल्पना सुचली. यासाठी पुण्यातून मुर्ती मागविण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी दिवाळी दरम्यान या मूतीर्ची स्थापना करण्यात आली. जवान उठल्यावर त्यांना महाराजांचे दर्शन घडावे अशाच ठिकाणी दोन्ही प्रतिकृती स्थापित केल्या आहेत.
मच्छल बटालियनच्या वतीने शिवरायांची एक मूर्ती नियंत्रण रेषेजवळ तर दुसरी मूर्ती मच्छल गावात तयार करण्यात आलेल्या मराठा स्मृतिस्थळ येथे बसविण्यात आली आहे. हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ मराठा बटालियनच्या जवानांनी या स्मृतीस्थळाची निर्मिती केली आहे.
या समृतीस्थळात एक भिंत उभारण्यात आली आहे. देशासाठी कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या ३२ जवानांची नावे त्या भिंतीवर कोरण्यात आली आहेत. यामुळे देशासाठी बलीदान देणाºया वीर जवानांचा इतिहास कायम सर्वसामान्यांपर्यंत पोहचत राहील, असेही कर्नल पवार यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App