The Kashmir Files : सिनेमा पाहिला नाही तरी… “द काश्मीर फाईल्स”वर बंदीची खासदार बद्रुद्दिन अजमल यांची मागणी!!


वृत्तसंस्था

गुवाहाटी : 1990 च्या दशकातल्या काश्मीर मध्ये झालेले हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य दाखवणारा सिनेमा” द काश्मीर फाईल्स” बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे पण देशात त्या सिनेमाच्या मुद्द्यावरून जबरदस्त वादंग माजला आहे. The Kashmir Files film mp badruddin ajmal

आसाम मधले युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे खासदार बद्रुद्दिन अजमल यांनी “द काश्मीर फाईल्स”वर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकार आणि आसाम सरकारकडे केली आहे. वास्तविक बद्रुद्दिन अजमल यांनी “द काश्मीर फाईल्स” सिनेमा बघितलेला नाही. याची कबुली त्यांनी स्वतःच दिली आहे. पण तरी देखील हा सिनेमा समाजातली शांतता आणि सौहार्द बिघडवणार आहे, असा आरोप करून बद्रुद्दिन अजमल यांनी या सिनेमावर बंदी देशात आणि आसाम मध्ये बंदी घालण्याची मागणी केली आहे.

– नल्ली नरसंहारावर सिनेमा नाही

केवळ काश्मिरी पंडितांवरच अत्याचार झाले असे नाही तर देशात अनेक जणांवर अत्याचार झाले आहेत. आसाममधल्या नल्ली जिल्ह्यात असेच मोठे शिरकाण झाले होते, पण त्यावर कोणी सिनेमा बनवला नाही, अशी राजकीय टिप्पणी देखील बद्रुद्दिन अजमल यांनी केली आहे.

– सरकारी कर्मचाऱ्यांना सवलत

आसाम मध्ये भाजपच्या हेमंत विश्वकर्मा सरकारने “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा टॅक्स फ्री केला आहेच, शिवाय राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना हा सिनेमा पाहणे सुलभ व्हावे यासाठी अर्ध्या दिवसाची सुट्टी देखील जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर आसाम मधलेच खासदार बद्रुद्दिन अजमल यांनी सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करणे याला राजकीय दृष्ट्या महत्व आहे आणि त्यामुळे आसाम मध्ये सिनेमावरून वाद पेटणार आहे.

The Kashmir Files film mp badruddin ajmal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात