दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांचा हटवादीपणा कायम, चाचण्या करून घेणार नसल्याचा भारतीय किसान युनियनचा इशारा


दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा हटवादीपणा कायम आहे. कोरोनाची टेस्ट करून घेणार नाही. त्यासाठी आंदोलनस्थळी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रवेश करून देणार नाही असा इशारा भारतीय किसान युनियनने दिला आहे.The Indian Farmers’ Union (IFU) has warned that the testing,vaccination of the agitating farmers in Delhi will not be


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा हटवादीपणा कायम आहे. कोरोनाची टेस्ट करून घेणार नाही. त्यासाठी आंदोलनस्थळी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रवेश करून देणार नाही असा इशारा भारतीय किसान युनियनने दिला आहे.

भारतीय किसान युनियनचे नेते गुरूनाम सिंग चडुनी यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांना कोरोनाचाचणी करून घेण्यास किंवा लसीकरणासाठी कोणीही बळजबरी करू शकत नाही. त्यासाठी आरोग्य कर्मचारी आले तर आम्ही त्यांचा विरोध करू.



काही दिवसांपूर्वी हरियाचे आरोग्य आणि गृहमंत्री अनिल वीज म्हणाले होते की हरियाणाला लागून असलेल्या दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकºयांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यांचे लसीकरणही करण्यात येणार आहे.

याचे कारण म्हणजे गुरगाव आणि फरिदाबादसह सोनीपत जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मात्र, चडूनी म्हणाले, टेस्ट आणि लसीकरण करायचे की नाही हा शेतकऱ्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे. आम्ही आरोग्य कर्मचाऱ्यांना आंदोलनस्थळी प्रवेशही करून देणार नाही.

केंद्र सरकारच्या नव्या कृषि कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केले आहे. सिंघू आणि टिकरी सीमांवर मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलन करत आहेत.

त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातील अकराशे शेतकऱ्यांनी आतापर्यंत लस घेतलीही आहे. मात्र, आता गुरूनाम सिंग यांच्या भूमिकेकमुळे इतर शेतकरी मात्र लसीकरणापासून वंचित राहणार आहेत.

The Indian Farmers’ Union (IFU) has warned that the testing,vaccination of the agitating farmers in Delhi will not be

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात