हरियाणात ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त काश्मिरी ब्राह्मणांच्या वेदना, संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बऱ्याच वादानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, या चित्रपटाबाबत हरियाणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हरियाणा सरकारने काश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त केला आहे. The film ‘The Kashmir Files’ tax-free in Haryana depicts the pain and struggle of Kashmiri Brahmins

९० च्या दशकात काश्मिरी ब्राह्मणांच्या, पंडितांच्या बेघर होण्याची आणि काश्मिरी पंडितांना घरातून पळून जावे लागले याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.शासनाचा हा निर्णय आदेशाची अंमलबजावणी झाल्यापासून ६ महिन्यांपर्यंत लागू राहणार आहे.



हा चित्रपट केवळ काश्मिरी पंडितांच्या वेदना, संघर्ष आणि आघात दाखवत नाही. हा चित्रपट त्या काळातील राजकारणावरही प्रश्न उपस्थित करतो. याबाबत सोशल मीडियात चर्चेचा बाजार तापला असून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. ‘द काश्मीर फाइल्स ‘ हा चित्रपट अनेक वादांनी घेरला होता. वादातून बाहेर आल्यानंतर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

कलम ३७० पासून ते काश्मीरच्या इतिहासापर्यंत विवेक अग्निहोत्रीच्या या चित्रपटावरही चर्चा झाली आहे. केवळ राजकीय कारणांमुळे काश्मिरी पंडितांच्या वेदना वर्षानुवर्षे कशा दडपून ठेवल्या गेल्या यावरही हा चित्रपट भाष्य करतो. मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यांसारख्या कलाकारांनी ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये उत्तम अभिनय केला आहे.

काही दिवसांपूर्वी जम्मूमध्ये काश्मिरी पंडित आणि इतरांसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. स्क्रिनिंगनंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले की, चित्रपट संपल्यानंतर लोक चित्रपट भावनांशी इतके जोडले गेले की ते रडू लागले.

The film ‘The Kashmir Files’ tax-free in Haryana depicts the pain and struggle of Kashmiri Brahmins

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात