सर्वसामान्यांची आमदनी वाढली असेल, तर महागाई वाढणारच; मध्य प्रदेशच्या मंत्र्यांचे अजब तर्कट


वृत्तसंस्था

इंदूर : सर्वसामान्य माणसाची आमदनी वाढली असेल, तर महागाई देखील थोडीफार वाढणारच, हे स्वीकारले पाहिजे, असे अजब तर्कट मध्य प्रदेशचे ग्रामीण विकास मंत्री महेंद्र सिंग सिसोदिया यांनी मांडले आहे. मी थोडा प्रॅक्टिकल बोलतो, असे पत्रकार परिषदेत सांगून महेंद्र सिंग सिसोदिया यांनी सध्याच्या वाढत्या महागाईचे एक प्रकारे समर्थनच केले आहे.the common man has increased, then inflation will rise; Strange argument of Madhya Pradesh ministers

ते म्हणाले, की सामान्य माणसाची आमदनी जर वाढली असेल, तर थोडीफार महागाई वाढेल हे स्वीकारले पाहिजे. दहा वर्षांपूर्वी सहा हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीला आज पन्नास हजार रुपये पगार मिळत असेल तर पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव दहा वर्षांपूर्वीचेच राहिले पाहिजेत, अशी अपेक्षा करणे चूक आहे. त्यामुळे जर सर्वसामान्य माणसाची आमदनी वाढली असेल, पगार वाढला असेल तर थोडीफार महागाई होणारच आणि ती स्वीकारली पाहिजे, असे महेंद्र सिंग सिसोदिया म्हणाले.



कोरोना काळात सर्वसामान्य माणसाला फटका बसल्याची कबुली देखील त्यांनी दिली. पण त्याच वेळी सरकारची बाजू मांडताना महेंद्र सिंग सिसोदिया यांनी सरकार प्रत्येक गोष्ट जनतेला मोफत देऊ शकत नाही. कारण सरकारचे इन्कम सोर्सेस आणि महसूल हा देखील मर्यादित आहे. हे समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.

दिवाळीसारख्या इं सणासुदीच्या काळात पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना महेंद्र सिंग सिसोदिया यांनी महागाईचे एक प्रकारे समर्थन केल्यामुळे सोशल मीडियावर ते ट्रोल होत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या भावाने शंभरी पार केली आहे. तेवढ्या प्रमाणात सर्वसामान्य माणसाची आमदनी वाढली आहे का?, याचा विचार करा मंत्रीमहोदय!!, अशा शब्दात नेटिझन्सनी महेंद्र सिंग सिसोदिया यांना फटकारले आहे.

the common man has increased, then inflation will rise; Strange argument of Madhya Pradesh ministers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात