ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राचा चेन्नई सुपर किंग्स टीमकडून सन्मान


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्स टीमने रविवारी नवी दिल्ली येथे 2020 टोकियो ऑलिम्पिक उत्कृष्ट कामगिरी करून भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकल्याबद्दल ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. चेन्नई सुपर किंग्सने नीरजला एक स्पेशल जर्सी देखील दिली आहे. 87.58 मीटरच्या रन नंतर जिंकलेल्या मेडलची आठवन म्हणून 8758 हा स्पेशल नंबर लिहिलेली ही विशेष जर्सी आहे.

Olympic gold medalist Neeraj Chopra honored by Chennai Super Kings team

“नीरजच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देशाला त्याचा अभिमान आहे. ट्रॅक आणि फील्डमध्ये पदक (सुवर्ण) जिंकणारा पहिला भारतीय बनून त्याने एक बेंचमार्क सेट केला आहे आणि त्याची कामगीरी पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे. 87.58 ही अशी संख्या आहे जी भारतीय क्रीडा इतिहासात नेहमी स्पेशल असेल. भविष्यातही त्याने देशाचे नाव मोठे करावे, अनेक सन्मान मिळवून द्यावेत अशी आमची इच्छा आहे, असे CSK सीईओ कासी विश्वनाथन यांनी म्हटले आहे.


Neeraj Chopra Wins Gold : नीरज चोप्राने भालाफेकीत रचला इतिहास, ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी जिंकले सुवर्ण, वाचा सविस्तर..


पुरस्कार आणि विशेष जर्सी मिळाल्यानंतर नीरजने सुपर किंग्ज टीमच्या व्यवस्थापकाचे आभार मानले आहेत.

ह्या सन्माना नंतर आपले मनोगत व्यक्त करताना नीरज म्हणतो, ‘गोल्ड मेडल जिंकल्यानंतर मला इतकं प्रेम मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. जे प्रेम मिळतंय ते अनपेक्षित आहे तरी चांगले वाटते आहे. आशा करतो की, मी कठोर परिश्रम करेन आणि देशाचे नाव रोशन करण्यास नेहमी प्रयत्न करेन.’

Olympic gold medalist Neeraj Chopra honored by Chennai Super Kings team

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*