विशेष प्रतिनिधी
हैदराबाद: भारतीय जनता पक्षाला राज्यात सत्ता मिळाली तर हैदराबादच्या पूर्वीच्या निजामाची मालमत्ता ताब्यात जप्त करून लोकांमध्ये वाटली जाईल, असे आश्वासन तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि करीमनगरचे खासदार बंडी संजयकुमार यांनी दिले आहे.Telangana BJP state president promises to seize Nizam’s property in Hyderabad
तेलंगणामध्ये सुरू असलेल्या प्रजा संग्राम यात्रेत बोलताना बंडी संजयकुमार म्हणाले, निजामाची सर्व संपत्ती आमची आहे. आम्ही मालमत्ता ताब्यात घेऊ आणि ती लोकांना परत देऊ. काही लोकांनी सामान्य लोकांच्या जमिनींवर अतिक्रमण केले आहे आणि त्यांना निजामाची मालमत्ता म्हणून प्रसिद्ध केले आहे.
मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निजामाची संपत्तीच राहिलेली नाही. कारण शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान यांच्या मालकीची सर्व मालमत्ता सरकारी झाली आहे. यामध्ये सध्याचे राजभवन, प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालय परिसर आणि इतरांचा समावेश आहे.
हैदराबादचा ख्यातनाम निजाम मुकरम जाह, चिरान पॅलेस, किंग कोठी पॅलेस, पुराणी हवेली, चौमोहल्ला पॅलेस आणि फलकनुमा पॅलेसचे मालक आहे. त्याचा भाऊ, मुफफाम जाह, चामलीजाह पॅलेसचा मालक आहे. निम्स रुग्णालयाच्या जमिनीसह निजाम ट्रस्ट मालमत्ता वक्फ मालमत्ता आहेत.
संजय कुमार म्हणाले, त्यांचा पक्ष हैदराबादमध्ये तालिबानी मानसिकता असलेल्या लोकांना राज्य करू देणार नाही. असदुद्दीन ओवेसी आणि के चंद्राशेखर राव या दोघांची ‘अपवित्र’ युती आहे. तामीळनाडूतील १२ टक्के अल्पसंख्यांकाच्या मतांवर राजकारण करत असलेल्या एआयएमआयला राज्यातून नेस्तनाबूत करू.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App