आसाराम पुत्र नारायण साईच्या दोन आठवड्यांच्या फर्लोवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती, बलात्कार प्रकरणात भोगतोय जन्मठेपेची शिक्षा


बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामचा मुलगा नारायण साईच्या फर्लो रजेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. खरं तर गुजरात उच्च न्यायालयाने नारायण साईला दोन आठवड्यांचा फर्लो मंजूर केला होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत नारायण साईंच्या फर्लोला स्थगिती दिली आहे. Supreme court stays order on two weeks furlough to asaram son narayan sai


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामचा मुलगा नारायण साईच्या फर्लो रजेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. खरं तर गुजरात उच्च न्यायालयाने नारायण साईला दोन आठवड्यांचा फर्लो मंजूर केला होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत नारायण साईंच्या फर्लोला स्थगिती दिली आहे.

उच्च न्यायालयाच्या जूनच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी गुजरात सरकारच्या वतीने एसजी तुषार मेहता हजर झाले. यापूर्वी नारायण साईंनी 14 दिवसांसाठी जामीन मागितला होता, त्यानंतर हायकोर्टाने साईची याचिका मंजूर केली होती.

आसारामचा मुलगा नारायण साईला सुरत सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आणि शिक्षा जाहीर केली. बलात्कार प्रकरणात नारायणला जन्मठेपेची शिक्षा झाली. यासह त्याच्यावर एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. नारायण साईला सुरत येथील दोन बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. सुरतच्या सत्र न्यायालयाने जवळपास 11 वर्ष जुन्या प्रकरणात शिक्षा सुनावली होती.

नारायण साईविरुद्ध सबळ पुरावे सापडले

पोलिसांनी पीडित बहिणींच्या निवेदनावर नारायण साई आणि आसारामविरोधात गुन्हा दाखल केला होता. यासह पोलिसांना घटनास्थळावरून अनेक पुरावे मिळाले. पीडितेच्या लहान बहिणीने पोलिसांना नारायण साईंविरोधात ठोस पुरावे दिले होते. घटनास्थळी सापडलेले पुरावेही या प्रकरणात महत्त्वाचे ठरले.

Supreme court stays order on two weeks furlough to asaram son narayan sai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात