लोकशाही देशात विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम निंदनीय : अशोक चव्हाण


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर उद्या महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मोदी  सरकारच्या शेतकर्यां विषयीच्या धोरणावर टीका केली आहे.

Suppressing the voice of the opposition in a democratic country is reprehensible: Ashok Chavan

मागील सात ते आठ महिन्यांपासून देशाच्या कानाकोपऱ्या मध्ये शेतकरी सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करताना दिसून येत आहेत. दिल्ली सीमारेषेवर मागील आठ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून, धरणे आंदोलनाच्या माध्यमातून, दिल्लीत लाल किल्ल्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत शेतकर्यांच्या आंदोलनाने रूप घेतले आहे. पण आता शेतकऱ्यांची देखील सहनशीलता संपत आलेली आहे. रोष, नाराजी, कायदे बदलण्यासाठी केंद्र सरकार तयार नसल्याची केंद्र सरकारची भूमिका या सर्व गोष्टींमुळे शेतकर्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. आणि हीच वेळ आहे जेव्हा ‘लोकाभिमुख नेतृत्त्व’ असण्याची देशाला गरज आहे. ‘लोकाभिमुख निर्णय’ घेतले गेले पाहिजेत आणि याचा गांभीर्याने केंद्र सरकारने विचार करावा असे देखील अशोक चव्हाण यावेळी म्हणाले आहेत.


अशोक चव्हाण यांना काळे झेंडे दाखविले म्हणून शिवसैनिकांना पोलीसांनी तुडवले, व्यथित होऊन शिवसेना सोडल्याचा सुभाष साबणे यांचा दावा


लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना प्रियांका गांधी यांना अटक करण्यात आली होती. या घटनेची देखील त्यांनी निंदा केली आहे. भारतासारख्या ‘लोकशाही’ देशामध्ये जर ‘विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी’ अशी कामे होत असतील, तर हे लोक कदापी सहन करणार नाहीत. याचा प्रतिकार वेगळ्या पध्दतीने केल्याशिवाय राहणार नाहीत. असा सूचक इशारा यावेळी अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला आहे.

लखीमपूर खैरी येथील हिंसाचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने शेतकर्यांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या बंदास लोकांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली आहे.

Suppressing the voice of the opposition in a democratic country is reprehensible: Ashok Chavan

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर