अशोक चव्हाण यांना काळे झेंडे दाखविले म्हणून शिवसैनिकांना पोलीसांनी तुडवले, व्यथित होऊन शिवसेना सोडल्याचा सुभाष साबणे यांचा दावा


विशेष प्रतिनिधी

नांदेड: नांदेडचे पालक मंत्री अशोक चव्हाण यांना काळे झेंडे दाखविणाºया शिवसैनिकांना पोलीसांनी अक्षरश: तुडवून मारले. त्यामुळेच व्यथित होऊन शिवसेना सोडल्याचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी सांगितले.Subhash Sabne claims that Shiv Sainiks were trampled by the police for showing black flags to Ashok Chavan.

देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्यावतीने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. साबणे यांच्या औपचारिक स्वागतासाठी देगलूर येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला.या मेळाव्यात बोलताना साबणे यांनी अशोक चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख टाळत निशाणा साधला. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले म्हणून पोलिसांकडून शिवसैनिकांना लाथांनी तुडविण्यात आले. शिवसैनिकांचा अपमान करण्यात आला. हे आपल्याला सहन झाले नाही. त्यामुळे अनेक शिवसैनिकांसह आपण भाजपामध्ये प्रवेश केला.

भाजप हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा असल्याचे सांगून साबणे म्हणाले, राज्यात भाजपा शिवसेना युतीचे सरकार असताना शेतकºयांना वेगवेगळ्या स्वरूपाची मदत मिळाली. मतदारसंघात रस्त्यांची कामे झाली. पण गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आणि विम्याचेही पैसे मिळत नाहीत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठीही पालकमंत्री येत नाहीत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक जिंकेल आणि विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या राज्यातील महाविकास आघाडीला दाखवून देईल की, तुम्ही कितीही पक्ष एकत्र आलात तरी भाजपा, रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य मिळून आम्ही विजयी होऊ. या मतदारसंघातील भाजपाच्या विजयाने राज्यातील राजकीय परिवर्तनाचा वेग वाढेल.

Subhash Sabne claims that Shiv Sainiks were trampled by the police for showing black flags to Ashok Chavan.

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण