विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशाने कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील शाळा १६ ऑ गस्टपासून तर महाविद्यालये १ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या शाळा आणि महाविद्यालये पन्नास टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.Success in overcoming Corona, schools in Uttar Pradesh will start from August 16 and colleges from September 1
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना उपाययोजनेवर झालेल्या वरिष्ठ बैठकीत हा निर्णय घेण्यता आला.राज्यातील माध्यमिक शाळा १६ ऑगस्टपासून ५० टक्के क्षमतेने सुरू होतील. त्यासाठी माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू होणार आहेत.
त्याचबरोबर महाविद्यालये एक सप्टेंबरपासून उघडण्याच्या सूचना जारी केल्या आहेत, ५ ऑगस्टपासून महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये पदवीधर वर्गातील प्रवेश या आठवड्यापासून सुरू होतील. पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश यापूर्वीच सुरू झाले आहेत.
मात्र, गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून शाळा आणि महाविद्यालये बंद होती. मात्र, अद्यापर्यंत प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. खाजगी शाळांचे व्यवस्थापन शाळाही सुरू करण्याची मागणी करत आहे.
उत्तर प्रदेश सरकारने कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. गेल्या २४ तासांमध्ये केवळ २५ जणांना प्रादुर्भाव झाला आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात आता फक्त ६४६ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत, त्यापैकी ४२६ होम आयसोलेशनमध्ये आहेत. गेल्या २४ तासांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट फक्त ०.०१ टक्के आहे. मात्र, राज्यातील एकूण पॉझिटिव्हीटी रेट २.५९ टक्के आहे. रिकव्हरी रेट 98.6 टक्के आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App