भारतीयांसाठी दिलासादायक बातमी, मेड इन इंडिया कोव्हॅक्सिन डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधातही प्रभावी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. भारताची ‘मेड इन इंडिया कोरोना प्रतिंबधक कोवॅक्सिन लस कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहे, अशी माहिती इंडियन कौन्सील ऑफ मेडीकल रिसर्चन (आयसीएमआर) दिली आहे.Good news for Indians, Made in India Covaccine effective against Delta Plus variant

कोरोना संसगार्ची दुसरी लाट काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र आता कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट आणि तिसऱ्या  लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चने दिलासादायक वृत्त दिले आहे. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लस प्रभावी असल्याचे आधीच म्हटले आहे. आता यावर आयसीएमआरने देखील शिक्कामोर्तब केले आहे.



कोरोना आपली रूपे बदलतो आहे. त्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटने तर चिंता अधिक वाढवली होती. आगामी तिसºया लाटेत मुख्य भीती डेल्टा व्हायरसची आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सिन लस डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात 77.8 टक्के आणि कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात 65.2 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला होता. तसेच कोरोनाच्या गंभीर प्रकरणात ही लस 93.4 टक्के आणि लक्षणे नसलेल्या कोरोनाविरोधात ही लस 63.6 सुरक्षित असल्याचे सांगितले होते.

सध्या अमेरिकेत कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट कहर करत आहे. अनेक जण यामुळे बाधित झाले आहेत. इतर देशांतही डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोना वाढत आहे. कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी ठरत असल्याने भारतीयांना दिलासा मिळणार आहे.

Good news for Indians, Made in India Covaccine effective against Delta Plus variant

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात