राज्यांमधल्या सहकारी संस्थांना केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्यकक्षेत आणणार नाही, पण त्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे, अमित शहांचे लोकसभेत लेखी उत्तर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – विविध राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या सहकारी संस्थांना केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्यकक्षेत आणण्याचा सरकारचा विचार नाही… पण सहकारी संस्थांनी जबाबदारीने देशाच्या आर्थिक विकासात योगदान दिले पाहिजे, असे लेखी उत्तर केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत दिले आहे.state coopratives not to incorporated in central coopration ministry

काँग्रेसचे नेते आणि शरद पवारांचे निकटवर्ती ए. के. अँटनी यांनी सहकार मंत्रालयाशी संबंधित तारांकित प्रश्न विचारला होता. यात केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या उद्देशापासून राज्यातील सहकारी संस्थांना केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्यकक्षेत आणणार काय, या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नाचाही समावेश होता.



अमित शहांनी या प्रश्नाला लेखी उत्तर दिले. त्यामध्ये त्यांनी राज्यांममधील सहकारी संस्थांना केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्यकक्षेत आणणार नाही, पण त्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे, असे स्पष्ट केले. लेखी उत्तरात अमित शहा म्हणतात, की देशात सहकार आंदोलन मजबूर करण्यासाठी, सहकारातून समृद्धीकडे जाण्यासाठी, सहकारी संस्थांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना झाली आहे.

सहकारी संस्थांनी आपल्या सदस्यांमध्ये जबाबदारीची भावना रूजवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान दिले पाहिजे. देशात सहकारितेचे आर्थिक विकासाचे मॉडेल यातून उभे राहिले पाहिजे.

राष्ट्रीय सहकार संघटनांचे विषय, राष्ट्रीय सहकार निगम, बहुराज्यीय सहकारी संस्थांचे नियमन, हे विषय केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्यकक्षेत येतील. तसेच २००२ च्या (अधिनियम २००२ – ३९) नुसार ज्या मल्टिस्टेट सहकारी संस्था आहेत, त्या केंद्रीय सहकारिता मंत्रालयाच्या कार्यकक्षेत येतील.

प्रशासनिक आणि अधिकारांचा वापर करण्याच्या दृष्टीने त्या केंद्र सरकारच्या आखत्यारित असतील, असे अमित शहा यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे. अधिनियम २००२ – ३९ हा केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार असताना बनवला गेला आहे. तेव्हा केंद्रात शरद पवार हे कृषिमंत्रीपदावर होते. केंद्रात सहकार मंत्रालय तेव्हा स्वतंत्र नव्हते.

state coopratives not to incorporated in central coopration ministry

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात