CBSE 10th Result 2021 : CBSE 10वीचा रिझल्ट जाहीर, कुठे आणि कसा पाहता येईल निकाल, वाचा सविस्तर…

CBSE 10th Result 2021 Check Central Board Of Secondary Education 10th Result on these links

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) इयत्ता 10वी 2021चा निकाल घोषित करण्यात आला आहे. सीबीएसई 10वीचे 21.5 लाख विद्यार्थी बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in वर जाऊन आपला निकाल चेक करू शकतात. अधिकृत वेबसाइट्सशिवाय इतर डिजिटल प्लॅटफॉर्म जसे की डिजिलॉकर वेबसाइट –digilocker.gov.in वरही रिझल्ट चेक करता येणार आहे. CBSE 10th Result 2021 Check Central Board Of Secondary Education 10th Result on these links


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) इयत्ता 10वी 2021चा निकाल घोषित करण्यात आला आहे. सीबीएसई 10वीचे 21.5 लाख विद्यार्थी बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in वर जाऊन आपला निकाल चेक करू शकतात. अधिकृत वेबसाइट्सशिवाय इतर डिजिटल प्लॅटफॉर्म जसे की डिजिलॉकर वेबसाइट –digilocker.gov.in वरही रिझल्ट चेक करता येणार आहे.

या वर्षी कोरोना महामारीमुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. या वर्षी परीक्षा न घेताच खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परफॉर्मन्सवर आधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे.

CBSE 10वी रिझल्ट 2021 cbseresults.nic.in वर कसा चेक करावा

सीबीएसई निकाल 2021 इयत्ता 10 cbseresults.nic.in वर पाहण्यासाठी या स्टेप्सना फॉलो करा.

  • सर्वात आधी cbseresults.nic.in वर जा.
  • होमपेजवर इयत्ता 10च्या निकालाची लिंक दिसून येईल.
  • ‘दसवीं कक्षा के परिणाम’ लिंकवर क्लिक करा.
  • आपल्या रोल नंबरसोबत लॉगिन करा.
  • स्कोअरकार्ड चेक करा आणि डाउनलोड करून घ्या.

भविष्यात संदर्भासाठी आपल्या 10वीच्या निकालाची प्रिंटाआउट घेऊन ठेवा.

CBSE 10वीचा निकाल अधिकृत वेबसाइटशिवाय डिजिलॉकरवरही उपलब्ध असेल. विद्यार्थी येथेही आपला निकाल चेक करू शकतात.

डिजिलॉकरवर कसे कराल चेक

  • सर्वात आधी डिजिलॉकरची वेबसाइट digilocker.gov.in वर जा.
  • ‘एज्युकेशन’ सेक्शनच्या अंडर, ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड’वर क्लिक करा.
  • इयत्ता 10वी पासिंग सर्टिफिकेट वा इयत्ता 10ची मार्कशीट सिलेक्ट करा.
  • सीबीएसई इयत्ता 10 निकाल 2021 अॅक्सेस करण्यासाठी सीबीएसईसोबत रजिस्टर्ड मोबाइल नंबरचा वापर करून लॉगिन करा.
  • रिझल्ट स्क्रीनवर दिसून येईल.

अशी होती सन 2020ची पासिंग टक्केवारी

गतवर्षी सीबीएसई इयत्ता 10वीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली होती. मुलींची पासिंग टक्केवारी 93.31% राहिली होती, तर मुलांची पासिंग टक्केवारी 90.14% राहिली होती.

CBSE 10th Result 2021 Check Central Board Of Secondary Education 10th Result on these links

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात