पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्याने मेहबूबा मुफ्ती केंद्रावर भडकल्या, काश्मीरींची बाजू घेत टीका


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरचे पोलिस अधिकारी देविंदर सिंह यांना गेल्या वर्षी वाहनातून दहशतवाद्यांना नेताना पकडले होते. मात्र, केंद्र सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. याउलट, निष्पाप काश्मिरी वर्षानुवर्षे दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत तुरुंगात खितपत पडले आहेत, अशा शब्दात केंद्राच्या दुटप्पी भूमिकेवर पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रावर टीका केली.

स्वत:च्या वाहनातून हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना नेताना सिंह यांना गेल्या वर्षी पोलिसांनी अटक केली होती.या पार्श्वभूमीवर मुफ्ती यांनी केंद्रावर हल्लाबोल केला.



त्या म्हणाल्या, सरकारी नोकरी असो की साधा पासपोर्ट मिळविणे, काश्मिरी नागरिकांना अत्यंत वाईट पद्धतीच्या छाननीचा सामना करावा लागतो. मात्र, दहशतवाद्याला मदत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला सोडून दिले जाते.

केंद्राची ही दुटप्पी भूमिका व गलिच्छ राजकारण स्पष्ट आहे. दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अटक केलेल्या काश्मिरींना वर्षानुवर्षे तुरुंगात डांबून ठेवले जाते. त्यांच्यासाठी सुनावणी एखाद्या शिक्षेसारखीच असते. मात्र, दहशतवाद्यांसोबत रंगेहाथ पकडलेल्या पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करण्याची केंद्राची इच्छा नाही.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात